Vasai Railway Station: प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवून फेकलं धावत्या ट्रेनसमोर, पतीचं भयानक कृत्याचा Live Video

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 10:25 IST

vasai Railway Station Case: वसईमधून (Vasai) सर्वांना हादरवणारी बातमी समोर येत आहे. वसई रेल्वे स्थानकावर (Vasai railway station) एका व्यक्तीनं पत्नीला रेल्वेसमोर फेकून दिलं.

Vasai Railway Station
प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या पत्नीला उठवून ट्रेनसमोर फेकले  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • वसई रेल्वे स्थानकावर (Vasai railway station) एका व्यक्तीनं पत्नीला रेल्वेसमोर फेकून दिलं.
  • या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.
  • एका व्यक्तीनं पत्नीला झोपेतून उठवून धावत्या रेल्वेखाली ढकलून दिलं.

वसई:  Man pushes wife in front of train:  पालघर जिल्ह्यातील (Palghar district) वसईमधून (Vasai)  सर्वांना हादरवणारी बातमी समोर येत आहे. वसई रेल्वे स्थानकावर (Vasai railway station) एका व्यक्तीनं पत्नीला रेल्वेसमोर फेकून दिलं. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.

एका व्यक्तीनं पत्नीला झोपेतून उठवून धावत्या रेल्वेखाली ढकलून दिलं. ही घटना रेल्वे स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृत महिलेचं वय अंदाज 30 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेनंतर आरोपी व्यक्ती आपल्या दोन मुलांना घेऊन फरार झाला आहे. दरम्यान आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. 

CCTV कॅमेऱ्यात घटना कैद 

रेल्वे स्थानकावर झोपलेल्या पत्नीला एका व्यक्तीनं उठवलं आणि तिला समोरून येणाऱ्या ट्रेनसमोर फेकून दिले. या घटनेत एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी व्यक्ती आपल्या दोन मुलांसह पळून गेला आहे. ही भीषण घटना प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रेल्वेकडून महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांना मिळताच सीसीटीव्ही तपासले. ज्यामध्ये आरोपी आपल्या पत्नीला ट्रेनसमोर फेकताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. सध्या तपासासाठी वसई पोलिसांच्या दोन टीम रवाना झालेल्या आहेत. 

अधिक वाचा- हनुमानाला प्रसन्न करण्याचे Best उपाय, चमकेल भाग्य
 
ही धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील वसई रोड रेल्वे स्थानकावरील आहे. रेल्वे स्थानक क्रमांक 5 वर एक व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसह उपस्थित होता. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये हा व्यक्ती स्थानकावर फेरफटका मारताना दिसत आहे. तो येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनवर लक्ष ठेवून होता. 

त्यानंतर ट्रेन जवळ येत असल्याचे बघून त्यानं मुलांसोबत झोपलेल्या पत्नीला उठवतो. ट्रेन जवळ येताच त्यानं पत्नीला रुळावर फेकले. ट्रेन खाली आल्याने महिलेचा मृत्यू झाला. आरोपी व्यक्ती आपली दोन मुलं आणि सामानासह तिथून पळ काढतो.

पोलिसांनी दिली माहिती 

एक्स्प्रेसची धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वेचे सहायक पोलीस आयुक्त भाजीराव महाजन यांनी दिली. महिलेला तिच्या पतीने ट्रेनसमोर फेकले. पत्नीची हत्या केल्यानंतर तरुण मुलांसह पळून गेला असल्याचं महाजन यांनी सांगितलं. 

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी