Muslim Protest against Noopur Sharma : महाराष्ट्रातील विविध शहरात मुस्लिम समुदायाचा भव्य मोर्चा 

JUMMA NAMAJ PROTEST : भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज देशभरात मुस्लिम समुदायाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला.

Massive rallies of Muslim community in various cities of Maharashtra demanding arrest of Nupur Sharma and Naveen Jindal
महाराष्ट्रातील विविध शहरात मुस्लिम समुदायाचा भव्य मोर्चा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केल्या वक्तव्याचा निषेध मोर्चा
  • या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज देशभरात मुस्लिम समुदायाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला.
  • शुक्रवारच्या जुम्म्याच्या नमाजनंतर हा मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते.

सोलापूर :  भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी आज देशभरात मुस्लिम समुदायाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला.  शुक्रवारच्या जुम्म्याच्या नमाजनंतर हा मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रातही सोलापूर, औरंगाबाद आणि जालना येथे प्रचंड मोठ्या संख्येत मुस्लिम समुदाय रस्त्यावर आला आणि निषेध केला. (Massive rallies of Muslim community in various cities of Maharashtra demanding arrest of Nupur Sharma and Naveen Jindal)

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिमांचे धर्मगुरू मोहम्मद पैंगबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. तरीही हाकलपट्टी करून भाजप नूपूर शर्मा हिला पाठिशी घातल आहे. तिच्यावर कारवाई करून अटक करावी ही प्रमुख मागणी मोर्चेकरी करत होते. या मोर्चामध्ये सर्व पक्षीय मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते. 

दरम्यान, सोलापूरमध्ये एम आय एम शहराध्यक्ष फारुख शाब्दिच्या नेतृत्वात हजारो मुस्लिम समाज आला एकत्र आला होता. त्यांनी हजारोंच्या संख्येने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. तसेच औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तशीच परिस्थीती जालनामध्येही आपल्याला दिसून आली. जालनाच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येत मुस्लिम समुदाय रस्त्यावर उतरला होता. 

सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी यांची रितसर परवानगी घेऊन मोर्चा काढला होता. पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा काढण्यात आला. परंतु, इतक्या मोठ्या संख्येने जमाव येणार याची कल्पना पोलिसांना नव्हती. 

SANGLI | मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कारवाई करा -: जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे

समस्त मुस्लिम समाजाचे दैवत असलेल्या हजारात मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हा अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. जर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माजी निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा व जिंदाल नामक व्यक्तीने मुस्लिम धर्मियांचे प्रेषित हजारात मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे शब्द वापरून टीका केली आहे. त्यांच्या या विधानाने जातीय तेढ निर्माण होऊन देशात दंगली व्हाव्यात असे प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या मनोविकृत नुपूर शर्मा व जिंदाल यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी. मोक्का कायद्यात बदल करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे, सद्दाम जमादार, अस्लम मुल्ला, इकलास पटेल, हाकिब मूतवल्ली, सुमान रोहले, इलियास पटेल आणि युनिस लष्करी उपस्थित होते.


पनवेल मध्ये नुपूर शर्माचा निषेध व्यक्त करण्यासाठी काढला मोर्चा

  1. पनवेल तहसील कार्यालयावर मुस्लिम समाजाने काढला भव्य मोर्चा.
  2. हजारो मुस्लिम बांधव आणि महिला मोर्चा मध्ये सहभागी.
  3. नुपूर शर्मा चा निषेध व्यक्त करण्यासाठी काढला मोर्चा.
  4. नुपूर शर्मा वर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देणार तहसीलदारांना.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी