Measles in Mumbai: काळजी घ्या, मुंबईत गोवरचा धोका वाढला; रूग्णांचा आकडा 617

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 13, 2022 | 11:14 IST

Measles Outbreak in Mumbai: ल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गोवरचे रूग्ण (Measles patients) वाढत आहेत.

Measles Outbreak in Mumbai
मुंबईत गोवरचा धोका वाढला, रूग्णांचा आकडा 617 वर 
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गोवरचे रूग्ण (Measles patients) वाढत आहेत.
  • गोवरच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याची माहिती समोर येतेय.
  • सद्यपरिस्थितीत मुंबईत आता गोवर संशयित रूग्णांची संख्या 617 इतकी नोंदवण्यात आली आहे.

मुंबई: Measles Outbreak in Mumbai: मुंबईकरांच्या ( Mumbaikars) चिंतेत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गोवरचे रूग्ण (Measles patients)  वाढत आहेत. गोवरच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याची माहिती समोर येतेय. सद्यपरिस्थितीत मुंबईत आता गोवर संशयित रूग्णांची संख्या 617 इतकी नोंदवण्यात आली आहे. या उद्रेकाची स्थिती पाहता केंद्र सरकारकडूनही  ( central government ) याची दखल घेण्यात आली आहे. 

वाढत्या रूग्णांची आकडेवारी 

जानेवारी ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये गोवर रुग्णांची संख्या 109 इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर या एका महिन्यात 84 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या एम पूर्व या प्रभागामध्ये आढळून आली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात गोवरचे 84 रुग्ण समोर आले आहेत.

अधिक वाचा-  हवेत दोन विमानांची जबरदस्त टक्कर, अपघाताचा Live Video

पालिकेकडून उपाययोजना सुरू 

मुंबईत गोवरचा वाढता प्रार्दुभाव पाहता मुंबई महापालिकेकडून विविध विभागात उपाययोजना करायला सुरूवात केली आहे. काल  केंद्रीय पथकाने एम-पूर्व विभागात जाऊन ठिकठिकाणी पाहणी केली. आज देखील केंद्रीय पथकाकडून गोवरचा उद्रेक असलेल्या विभागात जात पाहाणी आणि आढावा घेतला जाणार आहे. 

एम पूर्व विभागामध्ये आतापर्यंत 80,603 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर मुंबईमध्ये एकूण 9,16,119 घरांचे सर्वेक्षण केलं गेलं. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन गोवर संशयित रुग्णांचे सर्वेक्षण करत आहेत. तसंच संशयित रुग्णांना जीवनसत्व अ देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना जवळच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.  

9 महिने आणि 16 महिन्यांच्या बालकांसाठी लसीकरणाची अतिरिक्त सत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे. तसेच बालकांची तपासणी केली जात आहे. खासगी डॉक्टरांनाही गोवर आजार तसेच लसीकरणाबाबत माहिती दिली जात आहे. 

गोवरची लक्षणं काय आहेत
 
गोवरची चार प्रमुख लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसून येतात. यावेळी 104 अंशांपर्यंत उच्च ताप, खोकला, वाहती सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे अशी सुरूवातीची   लक्षणे दिसतात. त्यावेळीच 2 ते 3 दिवसांनंतर तोंडात लहान पांढरे डाग तयार होण्यास सुरूवात होते आणि  3 ते 5 दिवसात शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागतात. गोवरची पुरळ मुलांच्या चेहऱ्यावर, मानेवर, हात-पाय आणि तळव्यांना येऊ शकतो. तसंच गोवर लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्ग आहे. त्यामुळे त्यावर वेळेवर उपचार घ्यावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी