हुडहुडी वाढली...!, पारा 15 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज

Mumbai Weather Forecast : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा अनुभव येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथे रविवारी सकाळी 8.30 वाजता किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

Mercury will fall below 15 degrees, know the latest forecast of the Meteorological Department
हुडहुडी वाढली...!, पारा 15 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा इशारा
  • दोन दिवस सरासरी किमान तापमान 16-17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज
  • थंडीचा जोर वाढल्याने हवेतील प्रदूषणाची पातळी वाढणार

मुंबई : राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानात घट झाली आहे. विशेषत: मुंबईत सकाळच्या वेळी गुलाबी थंडी जाणवत आहे. राज्यात किमान तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान असले तरी. शुक्रवारी मुंबईचे तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. पण, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस सरासरी किमान तापमान 16-17 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर सोमवारी तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.(Mercury will fall below 15 degrees, know the latest forecast of the Meteorological Department)

अधिक वाचा : Sunday Mega Block | हुश्श…! या मार्गावरील मुंबईकरांना दिलासा, जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक

या हिवाळ्याच्या मोसमातील शहरातील सर्वात थंड दिवस 25 डिसेंबर रोजी होता जेव्हा किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा अनुभव येत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 8.30 वाजता सांताक्रूझ येथे किमान तापमान 15.6 अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे 18.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.IMD नुसार, सांताक्रूझ येथे शुक्रवारी किमान तापमान 20.4 अंश सेल्सिअस आणि कमाल 33.4 अंश सेल्सिअस (60 टक्के आर्द्रता) नोंदवले गेले. तर कुलाबा येथे किमान 22.2 अंश सेल्सिअस आणि कमाल 31 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर आर्द्रता 75 टक्के होती.

अधिक वाचा : Accident : आमदार योगेश कदमांच्या कारला भीषण अपघात; घातपाताचा संशय, घटनेनंतर कदमांनी दिली प्रतिक्रिया

काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने मुंबई आणि पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली आहे. येत्या दोन दिवसांत थंडीचा जोर वाढल्याने हवेतील प्रदूषणाची पातळी वाढणार आहे. त्यामुळे मुंबईची हवा अत्यंत धोकादायक पातळीवर (AQI) आणि पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी