Weather Updates: गणेशोत्सवात राज्यात कशी असेल पावसाची स्थिती?, हे आहेत लेटेस्ट अपडेट

गावगाडा
Pooja Vichare
Updated Aug 27, 2022 | 10:10 IST

Heavy Rain prediction In Maharshtra:राज्यातल्या इतर ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain update
राज्यातल्या पावसाची स्थिती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सध्या राज्यात पावसाचा (Maharshtra Rains) जोर ओसरला आहे.
  • राज्यात अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. मात्र राज्यातल्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
  • मुंबईतल्या (Mumbai) पावसाची स्थिती पाहता मुंबईसह ठाणे (Thane) भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rains) पडत आहे.

मुंबई: Maharshtra Rain Updates: सध्या राज्यात पावसाचा (Maharshtra Rains) जोर ओसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. मात्र राज्यातल्या काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मुंबईतल्या (Mumbai)  पावसाची स्थिती पाहता मुंबईसह ठाणे (Thane)  भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस  (Rains) पडत आहे. राज्यातल्या इतर ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याकाळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवण्यात आला आहे.  (Meteorological Department has predicted that intensity of rain will increase from September 1)

1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार 

राज्यात आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 1 सप्टेंबरपासून राज्यात पावासाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं आवाहन केलं आहे की, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं.

अधिक वाचा-  उपराजधानीला काळजी घेण्याची गरज, जिल्ह्यात Swine Flu चं थैमान; नागरिकांमध्ये वाढली धाकधूक

विदर्भाला यलो अलर्ट 

पुढचे काही दिवस राज्यात पावसानं विश्रांती घेतली असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. दरम्यान आजपासून पुढचे दोन दिवस विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातल्या इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. जून महिन्यापासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

राज्यातला पाऊस 

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली. या काळात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. यावेळी अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. या पावसात अनेक धरणे ही तुडूंब भरली आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी