डॉक्टर-रुग्ण लैंगिक संबंध अनैतिकच; मेडिकल कौन्सिलची भूमिका

गावगाडा
Updated Apr 19, 2019 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

वैद्यकीय क्षेत्रात भविष्यात ‘मीटू’सारखी मोहीम उभी राहू नये, यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नियमावली आखली आहे. त्यात डॉक्टर आणि रुग्ण हे नाते पालक आणि पाल्यासारखे असावे, असे म्हटले आहे.

doctor patient sexual relation will be treated as illegal says medical council
डॉक्टर आणि रुग्णांचे लैंगिक संबंध अनैतिकच   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • लैंगिक शोषणाच्या विषयावर वैद्यकीय क्षेत्र गंभीर
  • मीटू चळवळ टाळण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राची नवी नियमावली
  • 'डॉक्टर आणि पेशंट नाते, पालक आणि पाल्यासारखे असावे'

नागपूर : डॉक्टर आणि एखादा रुग्ण यांच्यातील संबंध हे पालक आणि पाल्यासारखे असणे गरजेचे आहे. दोघांमध्ये परस्पर संमतीने जरी शरीर संबंध निर्माण झाले तरी, ते अनैतिक असतील, असे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एथिकल कमिटीने स्पष्ट केले आहे. या संदर्भात कमिटिने नवीन नियमावलीच तयार केली आहे.

सध्या जगभरात ‘मीटू’ मोहिमेची चर्चा आहे. या मोहिमेच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटनांना वाचा फोडली जात आहे. चांगुलपणाची चादर ओढून बसलेल्या अनेक सेलिब्रिटिंच पितळ या मोहिमेमुळं उघडं झालं. हॉलीवूड, बॉलीवूड आणि कार्पोरेट क्षेत्रापर्यंत मर्यादित असलेली ही चळवळ आता प्रत्येक क्षेत्रात शिरकाव करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या पातळीवर लैंगिक शोषणाशी संबंधित किंवा कार्यालयीन कामकाजाशी संबंधित नियमावली बदलण्यात येत आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एथिकल कमिटीनेही पुढाकार घेतला असून, डॉक्टरांशी संबंधित नियमावली पुढे आणली आहे.

याबाबत कमिटीने म्हटले आहे की, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते हे पालक आणि पाल्य असे असायला हवे. भविष्यात या क्षेत्रात ‘मीटू’सारखी चळवळ उभी राहू नये, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. त्यासाठी नवे नियम लागू करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात परस्पर संमतीनेही लैंगिक संबंध किंवा अनैतिक संबंध निर्माण झाले असतील तर, ते मान्य केले जाणार नाहीत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या एथिकल कमिटीचे सदस्य डॉ. अनिल लध्दड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रात भविष्यात अशाप्रकारची कोणतीही चळवळ उभी राहू नये, यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. आम्ही करत असलेली नियमावली केवळ वैद्यकीय क्षेत्रासाठीच नव्हे तर, इतर क्षेत्रांसाठीही गरजेची आहे.’

काय आहे ‘#मीटू’ चळवळ?

‘#मीटू’ ही चळवळ कोणत्याही क्षेत्रात किंवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात चालवण्यात आलेली मोहीम आहे. पहिल्यांदा ट्विटरद्वारे #Me_Too हा हॅशटॅग वापरून, लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यात आला. अमेरिकेमध्ये हॉलीवूड अभिनेत्री अॅशले जड यांनी ५ ऑक्टोबर २०१७ रोजी न्यूयॉर्क टाइम्समध्ये मुलाखत दिली होती. त्यात तिने निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यानंतर हॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री यावर बोलू लागल्या. भारतात बॉलीवडूमध्येही तनुश्री दत्ता, राधिका आपटेसारख्या अभिनेत्रीं आपल्यावर ओढवलेले प्रसंग सांगितले. या मोहिमेत विकास बहल, आलोकनाथ, नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
डॉक्टर-रुग्ण लैंगिक संबंध अनैतिकच; मेडिकल कौन्सिलची भूमिका Description: वैद्यकीय क्षेत्रात भविष्यात ‘मीटू’सारखी मोहीम उभी राहू नये, यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नियमावली आखली आहे. त्यात डॉक्टर आणि रुग्ण हे नाते पालक आणि पाल्यासारखे असावे, असे म्हटले आहे.
Loading...
Loading...
Loading...