MHADA EXAM DATES: म्हाडाची परीक्षा पुढे ढकलल्या ; नवे  वेळापत्रक इथे पाहा 

Mhada Exam updates in marathi । महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत घेण्याची घोषणा करण्यात आली होती. पण एमपीएससीच्या परीक्षा आणि या परीक्षा यांच्या तारखा क्लॅश होत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

mhada recruitment exam  postpone due to clash with mpsc exam revised dates are 7 to 9 february  updates in marathi
म्हाडाची परीक्षा पुढे ढकलल्या ; नवे  वेळापत्रक इथे पाहा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • म्हाडाची २९, ३० जानेवारीची परीक्षा लांबणीवर
  • एमपीएससी परीक्षेसोबत क्लॅश होत असल्याने निर्णय
  • दोन दिवसांच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक जारी

MHADA EXAM NEW DATES । मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि म्हाडा प्राधिकरणाची भरती (MHADA) परीक्षा नेमकी एकाच दिवशी म्हणजे २९ आणि ३० जानेवारीला आल्यामुळे म्हाडाची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता म्हाडाने पुढे ढकलण्यात आलेल्या दोन दिवसांच्या परीक्षांचे नवे वेळापत्रक (MHADA Exam Revised Dates) जाहीर केले आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७, ८, ९ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी पेपरफुटीचा प्रकार लक्षात येताच म्हाडाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.  त्यानंतर, म्हाडाने ही परीक्षा २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत कालावधीत घेण्याची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याही (एमपीएससी) परीक्षांचा कालावधी हाच असल्याने अनेक उमेदवारांना एकाचवेळी एमपीएससी आणि म्हाडा भरती परीक्षा देणे शक्य होणार नव्हते.

Read Also : Public Holidays हा कायदेशीर अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालय

म्हाडा प्राधिकरणाने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता,  सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या सवर्गांकरिता २९ आणि ३० जानेवारी रोजी सहा सत्रांमध्ये होणारी ऑनलाइन परीक्षा फेब्रुवारी महिन्यात पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुढे ढकलण्यात परीक्षा सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. 

तीन सेशनमध्ये होणार परीक्षा

त्यानुसार सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक- टंकलेखक या संवर्गांकरिता नऊ सत्रात परीक्षा आयोजित केली आहे. ही परीक्षा

  1. पहिले सेशन -  सकाळी ९ ते सकाळी ११
  2. दुसरे सेशन -  दुपारी १२.३० ते २.३० 
  3. तिसरे सेशन -  सायंकाळी ४ ते ६ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी