Yogesh Kadam Car Accident News : शिंदे गटाचे (Shinde group) आमदार योगेश कदम ((MLA Yogesh Kadam)यांच्या कारला (Car)भीषण अपघात( Accident) झाला. पोलादपूर (Poladpur) तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. योगेश कदम हे सुखरूप असल्याचे सांगण्यात येत असून आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. योगेश कदम यांच्या अपघातामागे घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (MLA Yogesh Kadam's car terrible accident; Suspecting an accident)
अधिक वाचा : Sanjay Raut यांच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री 1.15 च्या सुमारास हा अपघात झाला. परंतु आई जगदंबेच्या कृपेने आणि आपल्या आशीर्वादाने मी माझे सर्व सहकारी सुखरूप आहेत. आपण कोणीही आमची चिंता करू नका. आज एका मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो आहे. मला कोणत्याही पद्धतीची दुखापत झालेली नाही. त्यासोबतच माझे पुढील सर्व नियोजित कार्यक्रम नियोजित वेळेवर पार पडणार आहे असं योगेश कदम म्हणाले.
अधिक वाचा : या 9 राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा,वाचा 12 राशींचे राशीभविष्य
दरम्यान, टँकरने आमदार कदमांच्या कारला धडक दिल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामागे घातपात घडवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, शिंदे गटातील शिवसैनिकांकडून अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे.
आमदार योगेश कदम यांच्या कारचा कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत अपघात झाला. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असतानाही टँकरने त्यांच्याच कारला धडक दिली. यामुळे ही धडक जाणीवपूर्वक दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आमदारांच्या कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने होती. तरीही टँकरने धडक दिली कशी? हा अपघात झालाच कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अधिक वाचा : सत्यनारायणाची कथा; पूजा विधी, महत्त्व आणि कथागीत
अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. आमदारांच्या कारला धडकल्यानंतर टँकर उलटला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या अपघातात आमदार कदम यांच्या कारचे आणि पोलीस वाहनाचेही नुकसान झाले आहे.