MLC Election Result 2023: विधानपरिषदेत महाविकास आघाडीची मुसंडी, नाशकातून सत्यजीत तांबे अन् कोकणात भाजपची बाजी

Maharashtra MLC Election Results 2023 Live: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूक सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना धक्का बसला असून महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.

MLC Election Result 2023: Mahavikas Aghadi defeat in Legislative Council, Satyajit Tambe from Nashak and BJP win in Konkan
MLC Election Result 2023: विधानपरिषदेत महाविकास आघाडीची मुसंडी, नाशकातून सत्यजीत तांबे अन् कोकणात भाजपची बाजी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी
  • नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधरमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत
  • कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप-शिंदे गटाने खाते उघडले

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन, भाजप-शिंदे गटाला एक आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात काॅंग्रेसचे बंडखोर सत्यजीत तांबे यांना यश मिळाले.  या निवडणूक भाजपचे होमग्राऊंड असलेल्या नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजपचे नागो गाणार आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे डाॅ. रणजीत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (MLC Election Result 2023: Mahavikas Aghadi defeat in Legislative Council, Satyajit Tambe from Nashak and BJP win in Konkan)

अधिक वाचा : Horoscope Today 3 February 2023 : या राशीच्या लोकांना मिळेल आज नशीबाची साथ, वाचा ३ फेब्रुवारीचे राशीभविष्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले सुधाकर अडबाले 8489 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे नागो गाणार यांचा पराभव केला आहे. तर अमरावती विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री रणजित पाटील यांच्यावर विजय मिळवला.

अधिक वाचा : IPO and FPO Meanning in marathi : IPO आणि FPO म्हणजे काय? यातील फरक जाणून घ्या मराठीत 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. त्यांनी भाजपचे किरण पाटील यांना 6655 मतांनी पराभूत केले. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अंतिम फेरीत अपक्ष सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्याविरोधात 14 हजार 693 मतांनी आघाडी घेतली आहे.

कोण कोठून निवडून आले?

  • नाशिक पदवीधर मतदारसंघातून काॅंग्रेसचे बंडखोर सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला. 
  • कोकण शिक्षक जागेवर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे  यांनी महाविकास आगाडीचे बलराम पाटील यांना पराभूत केले. 
  • औरंगाबाद शिक्षक जागेवर राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी भाजपचे किरण पाटील यांच्यावर बाजी मारली.
  • महाविकास आघाडीचे सुधाकर अडबळे यांनी नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या नागो गाणार यांच्यावर विजय मिळवला.
  • अमरावती पदवीधर मतदारसंघातून धीरज लिंगाडे (काँग्रेस) यांनी भाजपचे रणजित पाटील यांना धूळ चारली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी