मनसे नेत्यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा, राज ठाकरेंवर कारवाई केल्यास आंदोलन करू

Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीतील लाऊडस्पीकरबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या कारवाईविरोधात मनसेच्या नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

MNS leaders warn Mahavikas Aghadi government, if action is taken against Raj Thackeray, we will agitate
मनसे नेत्यांचा महाविकास आघाडी सरकारला इशारा, राज ठाकरेंवर कारवाई केल्यास आंदोलन करू ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंनी मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवण्याची मागणी
  • मनसे कार्यकर्ते हनुमान चालिसा लाऊडस्पिकरवर वाजविणार
  • औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरविरोधात केलेल्या भाषणावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महाविकास सरकारवर निशाणा साधला आहे. आता आमच्या पक्षप्रमुखांवर यापुढे कारवाई झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (MNS leaders warn Mahavikas Aghadi government, if action is taken against Raj Thackeray, we will agitate)

अधिक वाचा :

Covid-19 Maharashtra Report । आज राज्यात कोरोनाचे इतके नवे रुग्ण

याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी करणारी पहिली व्यक्ती शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे असल्याचा दावा जाधव यांनी केला. पण त्याच मागणीसाठी त्यांच्या मुलाने (उद्धव ठाकरे) राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा :

MHT CET 2022 Exam: महाराष्ट्र CET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या परीक्षेची नवीन तारीख

१ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मशिदींमधून लाऊडस्पीकर न हटवल्यास ४ मेपासून मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात करावी, असे सांगितले होते. या संदर्भात औरंगाबाद पोलिसांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रॅली आयोजकांविरुद्ध भादंविच्या (भारतीय दंड संहिता) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

'अटक केल्यास मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील'

याबाबत जाधव म्हणाले की, हे लोक (सरकार) ज्याप्रकारे रॅलीला परवानगी देण्यासाठी आमचा छळ करत होते, त्यावरून त्यांना राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवायचा होता. पुढची पायरी म्हणजे त्याची अटक. पण आमचा उद्देश निव्वळ सामाजिक आहे. "मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील... या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी प्रत्येक हिंदू असेच करेल," ते म्हणाले.

अधिक वाचा :

Naxal Attack In Gadchiroli: गडचिरोलीमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक पोलिस कॉन्स्टेबल जखमी 

त्याचवेळी मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, आमच्या पक्षाला राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार हे आधीच माहीत होते, कारण मेळाव्यासाठी घातलेल्या अटी अतिशय कडक होत्या. देशपांडे म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष रस्त्यावर उतरून सरकारला दिसेल. आम्ही खटल्यांना घाबरत नाही. आम्हाला घाबरवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, मात्र आम्ही त्यांना घाबरणार नाही, आम्ही आंदोलन करू.

औरंगाबाद शहरातील विविध पोलीस ठाण्याच्यावतीन मनसे कार्यकर्त्यांना आज रोजी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबद्दल मनसे कार्यकर्ते यांच्या कुटुंबाची संवाद साधला असता एका कार्यकर्त्याच्या आईने सांगितले की माझा मुलगा महाराष्ट्रासाठी काहीतरी करत असून आम्ही त्याच्या पाठीशी आहे त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करावे असेही त्या माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी