मनसेचा ३ मेंपर्यंत अल्टिमेटम ! मशिदींवरील भोंगे न हटवल्यास खळखट्याक?

Loudspeaker Row: नवी मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी.. 3 मे पर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून 4 मे पासून लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार आहेत.

। MNS ultimatum till 3rd May! Noise if the horns on the mosques are not removed
मनसेचा ३ मेंपर्यंत अल्टिमेटम ! मशिदींवरील भोंगे न हटवल्यास खळखट्याक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत सरकारला ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला
  • ३ मे रोजी अक्षय तृतीया असून या दिवशी मनसे ठिकठिकाणी हनुमान चालीसाचे पठण करणार
  • अयोध्येच्या ५ जूनच्या दौऱ्यावर राज ठाकरे जाणार आहेत.

मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केल्यानंतर भारतात लाऊडस्पीकरचा मुद्दा तापले आहे. दरम्यान, आज मनसेच्यावतीने नवी मुंबई कमिशनांना निवेदन देऊन ३ मे भोंगे हटविण्यात यावे, अन्यथा आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे. (MNS ultimatum till 3rd May! Noise if the horns on the mosques are not removed)

अधिक वाचा : MNS Meeting : मनसेच्या बैठकीत काय घडलं? अयोध्या जाण्यासाठी 10 ते 12 रेल्वे असतील आरक्षित तर अक्षय्य तृतीयेला काय आहे मोठा प्लान

मशिदींवरील भोंग हटविण्याच्या मुद्द्यावर विविध स्तरातून टीका होत असताना, राज ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले की ते धार्मिक कार्यांच्या विरोधात नाहीत, परंतु केवळ लाऊडस्पीकरच्या वापराच्या विरोधात आहेत, ज्याचा सर्व लोकांसाठी सामाजिक आणि आरोग्यावर परिणाम होतो.

अधिक वाचा :  Hanuman Chalisa : मशीदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा लावण्यास बंदी, नाशिक पोलिसांचे आदेश, भोंग्यावरही दिली प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सुरू असलेल्या लाऊडस्पीकरच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये हनुमान जयंती उत्सवानिमित्त जातीय हिंसाचार उसळला. गुजरात आणि कर्नाटकमध्ये इतर जातीय संघर्ष पहायला मिळाले आहेत.

अधिक वाचा :  Hanuman Chalisa : तुम्हालाही हनुमान चालीसाच्या दोन ओळी म्हणता आल्या नाहीत; राज ठाकरेंवर अमोल मिटकरींचा हल्लाबोल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी महाराष्ट्रतील सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वापरण्यासाठी पोलिसांची परवानगी बंधनकारक केली आहे. सर्व धार्मिक स्थळे किंवा धार्मिक कार्यक्रमात लाऊडस्पीकरचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

अधिक वाचा : Sanjay Raut : हनुमान जयंतीला राज्यात शांतता भंग करणार्‍यांचा डाव उधळून लावला - संजय राऊत

सर्व मशिदीतील लाऊडस्पीकर 'शांत' किंवा 'हटावले' जातील याची खात्री करण्यासाठी मनसेच्यावतीने 3 मे पर्यंत राज्य सरकारला 'अल्टीमेटम' दिला होता. तसे न केल्यास मनसे कार्यकर्ते मशिदीबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवतील, असा इशारा मनसेच्यावतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिला आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी