ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ९ एप्रिल रोजीच्या ठाण्यातील जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता ही उत्तर सभा १२ एप्रिल रोजी होणार आहे. अशी माहिती मनसे नेत्यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या सभेत राज ठाकरे महाविकास आघाडी सरकारचा कारभारचा पाढा वाचणार आहेत. (MNS's public meeting in Thane city got permission, now Raj Thackeray will speak on the street on 12th)
अधिक वाचा : “.... तुम्हारा क्या काम,” भोंग्यावरुन सुजातला मनसेचा सवाल
विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळाने ठाण्यात ही पहिलीच जाहिर सभा होणार आहे. मनसेच्यावतीने पोलिसांकडे दि. ८ एप्रिल रोजी सभेसाठी परवानगी मागितली होती. तिथे देवीचं मंदिर आहे. शेजारी गडकरी रंगायतनमध्ये त्याच दिवशी नियोजित कार्यक्रम आहेत. पोलिसानी ऐन नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सभेसाठी गर्दी उसळुन वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण होईल. असे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती.
अधिक वाचा : "मी शरद पवारांचा माणूस" वर भाजपने राऊतांची उडवली खिल्ली
पोलिसांनी या रस्त्यावर सभेसाठी परवानगी नाकारल्याने आज सकाळी बाळा नांदगावकर यांनीही ठाण्यात भेट देऊन रस्त्यावर टेबल टाकुन राज ठाकरे यांची सभा घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, आज दिवसभर मनसे नेत्यांनी काथ्याकूट केल्यानंतर पोलीसांनी नमते घेत ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी गडकरी रंगायतन येथील डॉ.मूस रस्त्यावरील सभेला परवानगी दिली दिल्याचे समज पत्र मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सुपूर्द केले.