Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, लवकरच ईडी मालमत्तेवर आणणार टाच

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 05, 2022 | 11:52 IST

Money Laundering Case: ईडीकडून नवाब मलिक यांना पुन्हा एकदा दणका बसणार आहे. ईडील मलिक यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची परवानगी मिळाली आहे.

Nawab Malik
ED कडून नवाब मलिकांना धक्का, कारवाईसाठी मिळाली परवानगी 
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना पुन्हा एकदा मोठा दणका बसणार आहे.
  • नवाब मलिक यांची (Nawab Malik's property) संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.
  • ईडीकडून होणारी ही कारवाई मलिकांसाठी मोठा धक्का असणार आहे.

मुंबई: Nawab Malik Money Laundering Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik)  यांना पुन्हा एकदा मोठा दणका बसणार आहे. नवाब मलिक यांची (Nawab Malik's property) संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. ईडीला तशी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ईडीकडून होणारी ही कारवाई मलिकांसाठी मोठा धक्का असणार आहे. 

या कारवाईत ईडी नवाब मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच आणण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात ईडी मुंबईत असलेल्या गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिममधील दोन फ्लॅट, उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमीन अशा संपत्तीवर टाच आणेल. 

अधिक वाचा-  स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन; आतापर्यंत 34 वेळा केलंय मतदान

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची दिवंगत बहिण हसीना पारकर संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत मलिकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात ईडीनं मलिक कुटुंबाची तात्पुरत्या स्वरूपात मालमत्ता जप्त केली. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीनं केलेल्या जप्तीला अधिनिर्णय प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही नवाब मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत. 

दरम्यान ईडीला संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाल्यानं मलिक कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यातच सध्या न्यायलयीन कोठडीत असलेले मलिक खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी