Monsoon 2022, Konkan Railway New Timetable : कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याच्या कालावधीसाठी कोकण रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू राहणार आहे.
कोकण रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या या कोकणातील रेल्वे स्थानकांवर त्यांच्या आधीच्या वेळापत्रकातील वेळेच्या एक ते दोन तास आधी येणार आहेत. पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील दुर्घटना टाळण्यासाठी दरवर्षी कोकण रेल्वे हा बदल करते. यंदाही हा बदल नव्या वेळापत्रकाच्याआधारे लागू झाला आहे. गाड्यांच्या वेगावर मर्यादा येणार आहे. पावळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. ही बाब विचारात घेऊन कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे.
पावसाळ्यासाठीच्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी येथून सुटणारी तुतारी एक्सप्रेस आता संध्याकाळी ५.५५ वाजता सुटेल. ही गाडी कुडाळ येथे संध्याकाळी ६.१६, कणकवलीत संध्याकाळी ६.४८ आणि वैभववाडीत संध्याकाळी ७.२२ वाजता पोहोचेल. सावंतवाडी येथून दिवा येथे जाणारी पॅसेंजर सकाळी ८.२५ वाजता सुटेल आणि कुडाळला सकाळी ८.४७, कणकवलीत सकाळी ९.२१, वैभववाडीत सकाळी १० वाजता पोहोचेल. मडगाव येथून मुंबईसाठी निघणारी कोकण कन्या एक्सप्रेस सावंतवाडी येथे संध्याकाळी ६.३०, कुडाळला संध्याकाळी ६.५०, कणकवलीत संध्याकाळी ७.२० आणि वैभववाडीत संध्याकाळी ७.५८ वाजता पोहोचेल. मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडी येथे दुपारी १.१८, कुडाळला दुपारी १.४०, कणकवलीत दुपारी २.१० वाजता पोहोचेल. मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी येथे सकाळी १०.०४, कुडाळला सकाळी १०.२४, कणकवलीत सकाळी ११.०२ आणि वैभववाडीत सकाळी ११.३२ वाजता पोहोचणार आहे. मंगला एक्सप्रेस कणकवलीत पहाटे ५.०२ वाजता पोहोचणार आहे. ओखा एक्सप्रेस दुपारी १ वाजून २ मिनिटांनी दर शनिवारी आणि गुरुवारी कणकवली येथे थांबणार आहे. मंगळुरू एक्सप्रेस कणकवलीतून मध्यरात्री १२.०८ वाजता सुटेल. कुडाळला थांबणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस रात्री ८.५० वाजता सुटेल. कोचिवली ते इंदूर ही गाडी कुडाळ येथून पहाटे ४.४० वाजता सुटेल. दररोज धावणारी नेत्रावती एक्सप्रेस कुडाळ येथून पहाटे ५.३२ वाजता सुटेल.