आला रे आला... कोकणाच्या वेशीवर मान्सून, जाणून घ्या- हवामान खात्याचा अंदाज

Monsoon update : हवामान खात्याने मान्सूनच्या संदर्भात आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे म्हणणे आहे की 29-30 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. साधारणपणे १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. मात्र यावेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आहे.

Aala re aala ... Monsoon at the gates of Konkan, know- weather department forecast
आला रे आला... कोकणाच्या वेशीवर मान्सून, जाणून घ्या- हवामान खात्याचा अंदाज ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मान्सूनच्या आगमनापूर्वी केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
  • केरळमधील हवामान पुढील काही दिवस असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
  • पुढील २-३ दिवसात मान्सून कोकण-गोवामध्ये पावसाची शक्यता

मुंबई : केरळमध्ये दाखल झाल्यानंतर नैऋत्य मान्सून देशाच्या इतर भागात सरकत आहे. त्याचा परिणाम दक्षिण भारतातील महाराष्ट्र, गोवा,  कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये दिसून येतो. पुढील चार-पाच दिवसांत या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाऊस अपेक्षित आहे. विशेष म्हणजे नैऋत्य मान्सून 1 जून रोजी ठरलेल्या वेळेच्या तीन दिवस आधी रविवारी केरळमध्ये पोहोचला. केरळमध्ये शनिवारपासून पाऊस पडत आहे आणि राज्यातील 14 पैकी 10 हवामान निरीक्षण केंद्रांवर 2.5 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. (Monsoon at the gates of Konkan, know- weather department forecast)

अधिक वाचा : 

Corona in Maharashtra : राज्यात आढळले कोरोनाचे तब्बल ७११ रुग्ण, एकट्या मुंबई शहरात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांच्या घरात

हवामान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, येत्या तीन ते चार दिवसांत नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या काही भागात, केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूच्या आणखी काही भागात, कर्नाटकात आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, देशातील या मान्सून हंगामात पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले, "या मान्सून हंगामातील सरासरी पाऊस दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103 टक्के असण्याची शक्यता आहे."

अधिक वाचा : 

MH CET Exam: CET साठी आता 12 वीचे मार्क्सही असतील महत्त्वाचे; राज्य सरकारचा मोठा निर्णय

आयएमडीने एप्रिलमध्ये सांगितले होते की देशात सामान्य पाऊस पडेल, जो दीर्घकालीन सरासरीच्या 99 टक्के असेल. चालू मान्सून हंगामासाठी अद्ययावत दीर्घकालीन अंदाज जारी करताना, महापात्रा म्हणाले, "देशाच्या बहुतांश भागात चांगला पाऊस पडेल." तर ईशान्य भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.

अधिक वाचा : 

Crime News : नागपुरातून दोन अट्टल चोरांना अटक, ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

अरबी समुद्रात केरळ किणारपट्टीजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे मान्सूनला गती मिळण्याची शक्यता आहे. आज अमरावती, नागपूर, वर्धासह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जूनला चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेचं, २ ते ७ जूनपर्यंत विदर्भात कोरडे वातावरण असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर तापमान किंचीत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी