‘बाय बाय’ मान्सून !, आता असं राहणार महाराष्ट्रातील हवामान

Monsoon Withdrawn News: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे की नैऋत्य मान्सूनच्या प्रस्थानानंतर 27 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, पुण्यासह राज्याच्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नाही.

Monsoon bid goodbye to Maharashtra, Meteorological Department made this prediction for Mumbai-Pune
‘बाय बाय’ मान्सून !, आता असं राहणार महाराष्ट्रातील हवामान ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मान्सून २०२२ महाराष्ट्रातून परतला
  • हवामान खात्याने मुंबई-पुण्यासाठी केला हा अंदाज
  • परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

End of Monsoon : नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राला निरोप दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, मान्सून (मान्सून 2022) आज (23 ऑक्टोबर) राज्यातून निघून गेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याचवेळी देशाच्या इतर भागातून मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. (Monsoon bid goodbye to Maharashtra, Meteorological Department made this prediction for Mumbai-Pune)

अधिक वाचा : Aaditya Thackeray : नवीन पत्रासाठी या चर्चा सुरु असतील, आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे यांना टोला

सध्या तरी पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सून राज्यातून पूर्णपणे निघून गेल्याची अधिकृत घोषणा आयएमडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाऊस संकट बनण्याची शक्यता नाही.

यंदा मान्सूनने परतत असतानाच राज्यात कहर केला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाले. याचा सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन आणि बाजरी पिकाला बसला. मुसळधार पावसाने शेती जलमय झाल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र आता राज्यातून मान्सून माघारीची अधिकृत घोषणा हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा : Navneet Rana : ऐन दिवाळीत खासदार नवनीत राणा तुरुंगात जाणार? कोर्टाकडून अटक करण्याचे वॉरंट जारी

नैऋत्य मान्सूनच्या प्रस्थानानंतर 27 ऑक्टोबरपर्यंत मुंबई, पुण्यासह राज्याच्या कोणत्याही भागात पावसाची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पण, बंगालच्या उपसागरावरील खोल दाब रविवारी संध्याकाळपर्यंत चक्रीवादळात तीव्र होऊ शकतो, ज्यामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग 100 किमी प्रतितास येण्याची अपेक्षा आहे. आयएमडीने सांगितले की त्याच्या प्रभावाखाली ओडिशातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अधिक वाचा : Aurangabad Visit: सत्ता बदलानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा सोडणार मुंबई, आज करणार औरंगाबादचा दौरा

गेल्या वर्षी देखील नैऋत्य मान्सून देशाच्या बर्‍याच भागात विलंबित झाला होता आणि 25 ऑक्टोबर 2021 रोजी देश सोडून गेला होता. IMD डेटानुसार, 2010 ते 2021 दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर 2017, 2010, 2016, 2020 आणि 2021 मध्ये पाच वेळा मान्सूनने देश सोडला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या नैऋत्य मान्सूनमध्ये देशात चांगला पाऊस पडण्याचे हे सलग चौथे वर्ष होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी