गोव्याची सीमा ओलांडून मान्सून कोकणात इलो !, राज्यात मुसळधार पाऊस पडणार, IMD ने जारी केला अलर्ट

Weather Update : गोवा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मान्सूनची स्थिती पूर्णपणे अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. या राज्यांमध्ये पुढील चोवीस तासात मुसळधार पाऊस पडेल.

Monsoon reaches Konkan, torrential rains in the state, IMD issues alert;
गोव्याची सिमा ओलांडून मान्सून कोकणात इलो !, राज्यात मुसळधार पाऊस पडणार, IMD ने जारी केला अलर्ट;  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती साधारणपणे होत आहे
  • राज्यात मुसळधार पाऊस पडणार, IMD ने जारी केला अलर्ट;
  • देशात मान्सूनचा प्रभाव दिसू लागला आहे

मुंबई : देशभरात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर देशातील इतर अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने दस्तक दिली आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सूनची वाटचाल सामान्यपणे सुरू असून आज गोव्याची सिमा ओलांडून तो कोकणात झाला आहे. आज दुपारपासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. (Monsoon reaches Konkan, torrential rains in the state, IMD issues alert;)

अधिक वाचा : 

Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात १३३२९ कोरोना Active, आज ३०८१ रुग्ण


मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडणार 

भारतीय हवामान विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ आरके जेनामानी यांनी सांगितले की, मान्सूनने 29 मे रोजी केरळच्या किनारपट्टीला स्पर्श केला आणि 31 मे ते 7 जून दरम्यान दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापला. ईशान्य भारताचा समावेश आहे. मान्सूनच्या प्रगतीला कोणताही विलंब होत नसल्याचेही ते म्हणाले. येत्या चोवीस तासांत मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : 

Muslim Protest against Noopur Sharma : महाराष्ट्रातील विविध शहरात मुस्लिम समुदायाचा भव्य मोर्चा 
येत्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मान्सूनची स्थिती पूर्णपणे अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. IMD ने गेल्या महिन्यात सांगितले होते की नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल आणि संपूर्ण हंगामात झालेल्या 50 वर्षांच्या सरासरी 87 सेंटीमीटर पावसापैकी 103 टक्के असेल. जून-सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्य पाऊस पडण्याचे हे सलग सातवे वर्ष असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी