Mumbai Metro : मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या दोन नव्या मार्गिकेचे उद्घाटन केले. तांत्रिक बिघाडानंतरही या मेट्रोला प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. रविवारी तब्बल ५० हजार प्रवाशांनी या नव्या मेट्रोचा लाभ घेतला आहे. शनिवारी रात्री केवळ दोन तासांत २० हजार नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर २ तासांत २० हजार प्रवाशांनी या मेट्रून प्रवास केला आहे.
नवीन मेट्रो सुरू झाली खरी परंतु तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना त्रासही सहन करावा लागाला. वेळेवर मेट्रो न धावल्याने प्रवाशांना १५ ते २० मिनिटे स्थानकावर थांबावे लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त डहाणुकरवाडी स्थानकातून हिरवा झेंडा दाखवून या मेट्रोचे उद्घाटन केले होते. शनिवारी रात्री ८ वाजल्यापासून सामन्य नागरिकांसाठी या मेट्रो खुल्या झाल्या. रात्री ८ ते १० दरम्यान तब्बल २० हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला.
रविवारी सुट्टी असतानाही बहुतांशी नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करणे पसंत केले. पश्चिम द्रुतगती मार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि एसव्ही रोडवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी मेट्रो ७ आणि मेट्रो २ ए कॉरिडॉर बनवण्यात अलाअ होता. पहिल्या टप्प्यात २० किलोमीटरची मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील किती वाहतूक कमी झाली हे लवकरच कळेल.
पहिल्याच दिवशी मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मेट्रो थांबल्यानंतर स्क्रीन डोअर उघडले जात नव्हते. तसेच जिथे स्क्रीन डोअर मेट्रो समोर उघडले नव्हते अशा अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. या मेट्रोची जबाबदारी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड आहे. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक एमडी शर्मा यांनी अशा तांत्रिक अडचणी समोर आल्याचे मान्य केले, परंतु लगेच या तांत्रिक अडचणी दूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
Maha Mumbai Metro Service Update | Due to technical error, train at Magathane towards Aarey has been withdrawn from service. Commuters have been accommodated in the next train. Regret the inconvenience.🙏
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) April 4, 2022