सातारा : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर यशाचे अनेक विक्रम मोडले आहेत. चित्रपटाची कथा आणि कलाकार तर जबरदस्त आहेतच, पण त्यातील गाण्यांनीही धमाल केली आहे. नुकताच या चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, यात रश्मिका मंदान्ना किंवा अल्लू अर्जुन दिसत नाहीत. तर, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (( MP Udayanraje Bhosale )) या गाण्याला त्याच्याच स्टाईलमध्ये ताल धरता दिसत आहेत. (MP Udayan Raje's dance to the song 'Pushpa', walking around Lungi in Satara)
खा. उदयनराजे यांचा पुष्पा गाण्यावर कॉलर डान्स'पुष्पा' च्या गाण्यावर खासदार उदयनराजेंनी धरला ताल, साताऱ्यात लुंगीवर मारला फेरफटका' Posted by Times Now Marathi on Monday, January 17, 2022
भाजप खासदार उदयनराजे भोसले कधी काय करतील याचा नेम नाही. त्यांनी आज पोवई नाक्यावरील 'राजधानी सेल्फी पॉईंट'वर चक्क 'लुंगी' घालून फोटो सेशन केले. यावेळी त्यांनी दाक्षिणात्य पद्धतीने पांढरी लुंगी परिधान केली होती. त्यांच्यासोबत समर्थकही लुंगीमध्ये दिसले. तिथं त्यांनी फोटोसेशनही केले. त्यानंतर कारमध्ये बसताना त्यांनी 'पुष्पा'तील गाण्यावर पुन्हा एकदा कॉलर उडवली.
सोशल मीडियावर खासदार उदयनराजे यांनी पुन्हा एकदा आपल्या स्टाईलने चाहत्यांना चकीत केले आहे. अल्लु अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या 'सामी सामी' या सुपरहिट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुष्पा चित्रपटाचे हे गाणे तशाच प्रकारे हिट झाले होते. आता यावर उदयनराजेंची लुंगी घालून केलेली डान्सिंग स्टाइल अजिबात चुकण्यासारखी नाही. उदयनराजे या गाण्यावर मस्ती करताना दिसत आहेत. ज्याला त्याच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे.