Udayanraje Bhosale : .... तर काय आभाळं कोसळणार का?, पोलिसांच्या यु टर्नमुळे उदयनराजे संतापले

Dalby : सातारा जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम वाजलीच पाहिजे अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.. उत्सव काळात डॉल्बी सिस्टीमला परवानगी नसल्याचे जिल्हा प्रशासनानं सांगितल्यानंतर आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी डॉल्बी का नको याचे कारण द्यावे असा जाब प्रशासनासह पाेलिसांना विचारला आहे.

MP Udayanraje Bhosale demanding Dolby system must be played
Udayanraje Bhosale : .... तर काय आभाळं कोसळणार का? उदयनराजेंचा सरकारला सवाल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जिल्ह्यात डॉल्बी वाजवण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली
  • माध्यमांशी बाेलताना खासदार उदयनराजे भाेसले संतापले
  • डॉल्बी वाजलीच पाहिजे, या मागणीसाठी उदयनराजे आग्रही

सातारा : उत्सव काळात सातारा जिल्ह्यात डॉल्बी वाजवली पाहिजे, या मागणीसाठी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस प्रशासनाकडे मागणी केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली. दरम्यान, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी यू टर्न घेत डॉल्बीला परवानगी नाहीच, अशी भूमिका मांडली. त्यानंतर आज साता-यात माध्यमांशी बाेलताना खासदार उदयनराजे भाेसले प्रशासनावर चांगलेच संतापले. (MP Udayanraje Bhosale demanding Dolby system must be played)

अधिक वाचा : Jai Jawan Dahihandi Mandal : जय जवान मंडळाचा 10 थरांचा विक्रम थोडक्यात हुकला 

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात काही कामानिमित्त खासदार उदयनराजे यांनी बैठका घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. खासदार उदयनराजे भाेसले यांनी डाॅल्बीबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले डाॅल्बी व्यावसायिकांच्या कुटुंबाचा प्रशासनानं विचार केला पाहिजे. त्यांनी माेठ्या प्रमाणात गुंतवणुक केली आहे. डाॅल्बीवर बंदी घातल्यानं त्यांना आर्थिक फटका बसत आहे. का डाॅल्बीला परवानगी नाकारली जातेय असा सवाल उदयनराजेंनी केला.
 

उदयनराजे म्हणाले केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनानं डाॅल्बीला परवानगी का नाही याचं पत्रक काढावं. प्रशासकीय अधिका-यांनी प्रत्येक घटकाचा विचार करुन निर्णय घेतले पाहिजेत. डाॅल्बी वाजलीच पाहिजे अशी माझी भुमिका आहे. दाेन तीन तासांनी काय आभाळ काेळसणार आहे का ? असा सवाल करीत उदयनराजे म्हणाले डाॅल्बी चालूच झाली पाहिजे या मताचा मी नाही सगळेच आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी