MPSC Exam Postponed: गट ब दर्जाची मुख्य परीक्षा ढकलली पुढे, या कारणामुळे आयोगाने घेतला निर्णय

MPSC Main Exam : एमपीएससीच्यावतीने   29, 30 जानेवारी आणि 5, 12 फेब्रुवारीला होणारी गट ब ची मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहे. या परीक्षांची पुढची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

MPSC Exam Postponed: Group B main exam postponed, For this reason, the Commission took a decision
MPSC Exam Postponed: गट ब दर्जाची मुख्य परीक्षा ढकलली पुढे, या कारणामुळे आयोगाने घेतला निर्णय   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमपीएससीच्यावतीने गट ब साठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत घोळ
  • उत्तर पत्रिका तपासताना चूक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
  • आयोगाने परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले.

मुंबई : एमपीएससी (MPSC) परिक्षांची तयारी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्य लोकसेवा आयोगाने  29, 30 जानेवारी आणि 5, 12 फेब्रुवारीला होणारी गट ब ची मुख्य परीक्षा पुढे ढकलली आहे. आयोगाने आयोगाने परिपत्रक काढत न्यायालयीन कारणामुळे परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण दिले आहे. (MPSC Exam Postponed: Group B main exam postponed, For this reason, the Commission took a decision)

एमपीएससीच्यावतीने गट ब साठी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत उत्तर पत्रिका तपासताना चूक झाल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांकडून केला होता. हा आरोप करणाऱ्या 86 विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी याचिका दाखल करुन आयोगाने उत्तर पत्रिका तपासताना चूक केल्याने आपली मुख्य परीक्षा देण्याची संधी एक किंवा दोन गुणांनी हुकल्याचे म्हटले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात परीक्षा देण्यास परवानगी देण्यात यावी असा निर्णय दिला होता.  त्यानंतर इतरही उमेदवारांनी त्यांनाही आयोगाच्या चुकीमुळे एक किंवा दोन कमी मिळाले आणि मुख्य परीक्षेची संधी हुकल्याचा  दावा करत न्यायालयात  याचिका दाखल केली होती. 

अधिक वाचा : http://Gopichand Padalkar । MPSC विद्यार्थ्यांसाठी पडळकर झाले आक्रमक

दरम्यान, विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन देखील करण्यात आले होते.  मात्र अचानकपणे मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास मर्यादित प्रमाणात असलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांमुळे परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं म्हणत एमपीएससीकडून या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षांची पुढची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी