मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021ची (State Services Main Exam 2021) सर्वसाधारण गुणवत्ता यादी (merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. MPSCनं ट्विटद्वारे याची माहिती दिली असून जाहीर झालेल्या यादीत सांगलीचा प्रमोद चौगुले हा सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शुभम पाटीलने बाजी मारली आहे. (State Services Main Exam 2021 Provisional Merit List Announced; Sangli's Pramod Chowgule is the first in the state )
अधिक वाचा : कमी बजेटमध्ये सोलो ट्रिप कशी करणार?
तर मुलींमध्ये सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पाहिला आला होता.
अधिक वाचा : मुलं असं करत असतील तर प्रेमात तुमचाही दिग्यासारखा गेम होणार
दरम्यान, आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर करत संवर्गाचे पसंतीक्रम (Preference Number)सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन दिला आहे. या काळात उमेदवारांनी आपला पसंतीक्रम सादर करावा असं आवाहन एमपीएससीने केलं आहे.
ट्विटरवर जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात आयोगाने म्हटले की, या परीक्षेची सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो, काही उमेदवार अपात्र ठरू शकतात असं एमपीएससीने स्पष्ट केलं आहे.
अधिक वाचा : संयुक्त कुटुंबात असताना पतीसोबत कसा कराल रोमान्स
या परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग/पदासाठी पसंतीक्रम (Preference Number) पर्याय सादर करण्याकरता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ONLINE FACILITES या मेनूमध्ये 'Post Preference वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही वेबलिंक 3 मार्च 2023 रोजी 14.00 वाजेपासून दिनांक 10 मार्च 2023 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
1- वेबलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व 20 संवर्गाकरीता 1 ते 20 मधील पसंतीक्रम अथवा No Preference' विकल्प निवडणे अनिवार्य आहे.
2- अधिसूचित सर्व संवर्गाकरिता 1 ते 20 मधील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार निवडीकरीता विचार होईल.
3- अधिसूचित 20 संवर्गापैकी किंवा पदांपैकी ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक आहे; केवळ त्याच पदाकरिता पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांवरील निवडीकरिता इच्छुक नाही. त्या पदांकरीता 'No Preference' हा विकल्प निवडावा.
4- संवर्गाचे पसंतीक्रम सादर केल्यानंतर 'Download PDF' हा पर्याय निवडून उमेदवारास सादर केलेले पसंतीक्रम जतन करून ठेवता येऊ शकतील.
5- पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग किंवा पदांकरीता पसंतीक्रम सादर करतील केवळ त्याच संवर्ग/पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
6- विहित कालावधीनंतर संवर्ग/ पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.