मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, एमपीएससी प्रिलिम्स 2021 संबंधित अपडेट्स येथे तपासता येतील. नुकतेच आयोगाने जाहीर केले आहे की ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलली जाणार नाही. हे वेळापत्रकानुसार आयोजित केले जाईल आणि उमेदवार अधिकृत वेबसाइट - mpsc.gov.in वर अधिक तपशील मिळवू शकतात.
MPSC प्रिलिम्स 2021 23 जानेवारी 2022 रोजी राज्यभर होणार आहे. वाढत्या कोविड-19 प्रकरणांमध्ये, परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या शक्यतांना उधाण आले होते. तथापि, आयोगाने सर्व अफवांना पूर्णविराम देत त्यावर स्पष्टीकरण जारी केले आहे.
ही परीक्षा पुढे ढकलली जाणार नसल्याची घोषणा एमपीएससीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आली.
दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही पुढे ढकलण्यात आली नाही. यासंदर्भात काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली माहिती चुकीची आहे — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 17, 2022
एमपीएससी प्रिलिम्स 2021 अॅडमीट कार्ड डिसेंबर 2021 मध्ये आधीच जारी करण्यात आली आहेत. उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी मार्गदर्शक तत्त्वे पाळण्याचा आणि त्यांची प्रवेशपत्रे (admit cards) परीक्षा हॉलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी नेहमीच कोविड-19 सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे.
ही परीक्षा सुरुवातीला 2 जानेवारी 2022 रोजी होणार होती. मात्र, अपरिहार्य कारणांमुळे ती 23 जानेवारी या नवीन तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. यावेळी हजारो उमेदवारांनी या भरती मोहिमेसाठी अर्ज केले आहेत. राज्य सेवेतील 290 जागा उपलब्ध आहे.
MPSC प्रिलिम्स 2021 ची परीक्षा 400 गुणांसाठी घेतली जाईल. पेपर दोन विभागांमध्ये विभागला जाईल - सामान्य अध्ययन किंवा जीएस आणि सिव्हिल सर्व्हिसेस अॅप्टिट्यूड टेस्ट किंवा सीएसएटी (CSAT).
पूर्वीच्या पेपरमध्ये 100 प्रश्न विचारले जातील, तर नंतरच्या पेपरमध्ये 80 प्रश्न विचारले जातील. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की दोन्ही पेपर प्रत्येकी 2 तासांत पूर्ण केले पाहिजेत. टाइम्स नाऊ मराठीकडून एमपीएससी प्रिलिम्स २०२१ च्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा!