MSEB च्या अभियंत्याला भाजप नेत्याकडून मारहाण, पोलीस ठाण्यात १२ जणांवर गु्न्हा दाखल

Dharashiv crime news : धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेत्याने महावितरणच्या अभियंत्याला मारहाण झाल्याची घटना घडली.

MSCB engineer beaten up by BJP leader, registered at police station
MSCB च्या अभियंत्याला भाजप नेत्याकडून मारहाण, पोलीस ठाण्यात १२ जणांवर गु्न्हा दाखल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महावितरणच्या अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
  • भाजप नेत्यासह १५ जणांवर गुन्हा
  • अभियंता गंभीर जखमी

धाराशिव : महावितरण कंपनीच्या अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे नेते सुधीर पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा अभिराम पाटील तसेच स्विय सहाय्यक स्वप्नील पाटील यांच्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविद्र फकीरा पवार (वय 52 वर्षे) यांनी तक्रार दाखल केली आहे. (MSeB engineer beaten up by BJP leader, registered at police station)

अधिक वाचा : Crime News: महाराष्ट्र हादरला! प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर प्रेयसीवर सामुहिक बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद प्रभारी कार्यकारी अभियंता हे एमएसईबी रेस्ट हाऊस सोलापुर रोडवरील पळसवाडी रोड लगत रेस्ट हाऊसचे पाठीमागील बाजुस मेजर स्टोअर मध्ये कार्यालयीन कामकाज करत होते.  सुमारे  11.00 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सोबत स्टोअर किपर राजू काळे हा पण सोबत काम करत होता. यावेळी उस्मानाबाद येथील सुधीर केशवराव पाटील, अभिराम सुधीर पाटील, स्वप्नील पाटील व इतर दहा ते बारा लोक हे अचानक कार्यालयात येवून शिवीगाळ करत आले. त्यांनी शिवीगाळ करत पाटील आणि त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी खाली पाडून लाथाबुक्यांने मारहाण केली. त्यानंतर जिवे मारण्यांची धमकी दिली.

अधिक वाचा : Mumbai metro : मुंबईकरांसाठी खुशखबर, मेट्रोच्या तिकिटांवर सूट...

या घटनेनंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधीर पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा अभिराम पाटील तसेच स्विय सहाय्यक स्वप्नील पाटील यांच्यासह १५ जणांवर  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी