Mandarin Oriental | नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींचा सध्या लक्झरी रिअल इस्टेटमध्ये खूप रस असल्याचे पाहायला मिळत आहे. लंडनची ऐतिहासिक मालमत्ता स्टोक पार्क विकत घेतल्याच्या काही दिवसांनंतर त्यांची कंपनी आता न्यूयॉर्कचे प्रीमियम लक्झरी हॉटेल मंडारीन ओरिएंटल (Mandarin Oriental) खरेदी करणार आहे. या मालमत्तेची भलेही ऐतिहासिक स्टोक पार्कशी तुलना केली जाऊ शकत नाही पण लक्झरी हॉटेलच्या बाबतीत हे खूप खास आहे. लक्षणीय बाब म्हणजे हे हॉटेल केवळ जगातील महागड्या हॉटेलांपैकी एक नसून कित्येक हॉलिवूडमधील सुपरस्टार (Hollywood Superstar) कलाकारांचे आवडते ठिकाण देखील आहे. (Mukesh Ambani's new hotel Mandarin Oriental with total 248 rooms rent of one room 10 lakhs).
Mandarin Oriental च्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, आयर्लंडचा अभिनेता लियाम नीसन आणि अमेरीकेची अभिनेत्री लूसी लियू सोबत कित्येक हॉलिवूड सुपरस्टारांसाठी हे न्यूयॉर्कचे सर्वात आवडते ठिकाण आहे. हे हॉटेल हडसन नदीच्या दृश्यासाठी प्रसिद्ध आहे. हे हॉटेल बहुमजली इमारतीत आहे आणि त्याची व्याप्ती ३५ व्या ते ५४ व्या मजल्यापर्यंत आहे.
न्यूयॉर्कच्या प्राइम लोकेशन प्रिस्टाइन सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कल जवळ असलेले हे हॉटेल २००३ मध्ये पूर्ण झाले. यामध्ये २४८ खोल्यांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे इथे राहण्यासाठी दररोज कमीत कमी ५५ हजार रूपये खर्च करावे लागतील. या हॉटेलमधील सर्वात स्वस्त रूम ७४५ डॉलरवर रोजच्या भाडेतत्वावर मिळते.
हॉटेल ORIENTAL SUITE चे भाडे ऐकून सर्वानांच धक्का बसेल. त्यात एक रात्र घालवण्याचे भाडे १४ हजार डॉलर म्हणजेच १० लाख रुपये एवढे आहे. हॉटेलमध्ये दोनपेक्षा जास्त लक्झरी पर्याय आहेत. तर ५३ व्या मजल्यावर असलेल्या प्रेसिडेन्शियल सूट (Presidential Suite) आणि सुटचे (Suite) ५००० रूपयांहून अधिक भाडे आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज समूह हा करार सुमारे $981 दशलक्ष म्हणजेच सुमारे ७२८ कोटी रुपयांमध्ये करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (RIIHL) मार्फत हा करार केला जाणार आहे. या उपकंपनीने हॉटेल खरेदी करण्यासाठी कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (केमन) सोबत करार केला आहे, ज्यांच्याकडे मँडरिन ओरिएंटलमधील ७३.३७ टक्के हिस्सा आहे.