Building collapsed in Borivali Mumbai: मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. बोरिवलीत एक चार मजली इमारत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. बोरिवलीतली साईबाबा नगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. गितांजली इमारत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Building collapsed in Saibaba Nagar Borivali Mumbai)
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली आहे. ही इमारत धोकादायक असल्याचं मनपाकडून जाहीर करण्यात आलं होतं. ही इमारत ३० ते ३५ वर्षे जुनी होती. इमारत धोकादायक असल्याने इमारतीतील नागरिकांनी सकाळीच आपले घर रिकामे केली होती. इमारतीमधील नागरिक सकाळीच इमारतीमधून बाहेर पडले होते आणि त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.
Maharashtra | A four-storey building collapsed in Saibaba Nagar of Borivali West in Mumbai. Details awaited: Fire Brigade — ANI (@ANI) August 19, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, साईबाबा नगर परिसरात गितांजली ही रहिवासी इमारत आहे. या परिसरात अनेक जुन्या इमारती आहेत. गितांजली इमारत ही सुद्धा जुनी इमारत होती. इमारत जुनी होती आणि मनपाने यापूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचं जाहीर केलं होतं. ही इमारत कोसळतानाची दृष्ये मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
अधिक वाचा : Saibaba nagar building collapse: बोरिवलीतील गितांजली इमारत कोसळतानाचा LIVE VIDEO
इमारतीमधील सर्व रहिवाशांनी सकाळीच आपली घरे रिकामी केली होती. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास संपूर्ण इमारत पत्त्याच्या पानांसारखी कोसळली. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीत कुणी नागरिक उपस्थित तर नव्हते ना? यासाठी खबरदारी म्हणून अग्निशमन दलाकडून ढिगारा बाजूला करुन तेथे कुणी अडकलेले तर नाहीये ना याची तपासणी घेत आहेत.