Pui Bridge : मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड पुई पूल धोकादायक; सावित्री पूलाप्रमाणे दुर्घटनेची भिती, नवीन पुलाची मागणी

Pui Bridge : रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील मुख्य महामार्ग व अंतर्गत मार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता असाच एक जुना पूल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर असल्याचे निदर्शनास आले आहे. हा पूल खलाच्या आणि वरच्या बाजूने पोखरलेला असून या पुलाची अवस्था दयनीय आहे.

mahad pui bridge
कोलाड पुई पूल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील मुख्य महामार्ग व अंतर्गत मार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
  • आता असाच एक जुना पूल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर असल्याचे निदर्शनास आले आहे.
  • हा पूल खलाच्या आणि वरच्या बाजूने पोखरलेला असून या पुलाची अवस्था दयनीय आहे.

Pui Bridge : रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील मुख्य महामार्ग व अंतर्गत मार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.  आता असाच एक जुना पूल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर असल्याचे निदर्शनास आले आहे. हा पूल खलाच्या आणि वरच्या बाजूने पोखरलेला असून या पुलाची अवस्था दयनीय आहे. कोलाड पुई गावानजीक असलेला महिसदरा नदीवरील हा ब्रिटिशकालीन  पूल आहे. हा पूल सध्या वाहतूक आणि प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत  जीवघेणा आणि धोकादायक बनला आहे.  (mumbai goa highway dangerous bridge local people demand new bridge)

अधिक वाचा :

मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटरच पहिल्या टप्प्याचे काम तब्बल 13 वर्षांपासून रेंगाळले आहे. अशातच या मार्गावरील पुलांची कामे देखील रखडली आहेत. पुई गावालगतच्या या पुलावरून दिवसरात्र प्रवाशी वाहतुकीसह अतिशय अवजड, ओव्हरलोड वाहनांची वाहतोक होते. अरुंद पूल असल्याने वाहतुकीला देखील वारंवार अडथळा येत आहे. इतकेच नाही तर पुलावर अनेक वाहनांचे अपघातही झाले आहेत.  

अधिक वाचा :

या पुलावरून जेव्हा वाहने जातात एव्हा पुलाला जबर हादरे बसतात. पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पुलाची खालील बाजू खचली आहे. पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. तसेच सळ्याही बाहेर निघाल्या आहेत. संबंधित प्रशासन  व सरकारने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करावी तसेच नवीन पुलाचे मजबूत व दर्जेदार बांधकाम करून प्रवाशी व वाहनचालक यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करावा अशी मागणी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी