Mumbai-Goa Highway : अंजनारी पुलावरून टँकर पलटी; चालक जागीच ठार, नदीत गॅसची गळती

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर लांजायेथे झालेल्या भीषण अपघातात टॅकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Breaking News
Mumbai-Goa Highway : अंजनारी पुलावरून टँकर पलटी; चालक जागीच ठार, नदीत गॅसची गळती   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबई -गोवा महामार्गावर भीषण अपघात
  • टॅंकर नदीत पलटी
  • चालक जागीच ठार

रत्नागिरी (सचिन कांबळे) : मुंबई -गोवा महामार्गावर लांजा येथील अंजनारी पुलावरून एलपीजी गॅसचा टँकर नदीत पलटी झाला आहे. यामध्ये चालक जागीच मृत्यू पावला आहे. तसेच नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकरची गॅस गळती सुरू आहे. ( Mumbai-Goa Highway: Tanker Overturns on Anjanari Bridge; Driver killed on the spot, gas leak in river)

अधिक वाचा : Devendra Fadnavis: 'तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला', फडणवीसांचा थेट आरोप..

मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार 28 हजार kv टनाचा जम्बो टँकर लांजा येथील अंजनारी पुलावरून एल पी जी गॅस चा टँकर नदीत पलटी झाला आहे. यामध्ये चालक जागीच मृत्यू पावला आहे. घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी धाव घेतली. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, टँकरमधील गॅस गळती सुरू परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण आहे. सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

गेल्या महिन्यात कोकणात पावसाने जोर धरला होता. त्याचा फटका मुंबई-गोवा महामार्गाला बसला. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. तसेच अंजनारी पुलावरची वाहतूक बंद करण्यात आला होता. लांजा तालुक्याजवळ अंजनारी पुलाजवळ पाणी वाढले होते. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.  त्यामुळे मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणारी आणि गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. 

कोकणातील तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग. कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी १९९८ पर्यंत राष्ट्रीय जुना महामार्ग १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असायची, तशी आजही आहे. मात्र, वाढती वाहने आणि लोकसंख्येनुसार महामार्गाच्या रुंदीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने येथून प्रवास करणाऱ्यांना त्याचे त्रास भोगावे लागत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी