Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचं थैमान, मुसळधार पावसाचा इशारा; BMC नं केलं महत्त्वाचं Tweet

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 12, 2022 | 12:40 IST

Mumbai Rain Update: मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनंही (Mumbai Municipal Corporation) ट्विट केलं आहे.

Mumbai Rain
मुंबईत पावसाचा कहर 
थोडं पण कामाचं
  • राज्यात पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे.
  • राज्यात आजही पावसाचा जोर कायम आहे.
  • मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई: Mumbai Rain Update: राज्यात पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे. राज्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेनंही (Mumbai Municipal Corporation) ट्विट केलं आहे. मुंबई शहर (Mumbai city)  आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आज जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. अधूनमधून वादळी वारे 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहतील. 

मुंबई इंडियन मेट्रोलॉजिकल सेंटरनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यातील घाट भागात हलक्या ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर IMD कडून राज्यात कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता असल्यानं रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

अधिक वाचा-  Breaking: मुसळधार पावसाचा पुण्याला फटका, नाना पेठेत मोठी दुर्घटना; दुमजली इमारतीची भिंत कोसळली; बचावकार्य सुरू

नाशिकमध्ये ही पावसाचं धुमशान 

मुंबई आणि परिसरात सोमवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गडचिरोलीत पावसानं थैमान घातलं आहे. नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात असलेली मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी ही 14 जुलैपर्यंत भारतीय हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांत 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

गडचिरोलीत तीन जण बेपत्ता 

गडचिरोली येथे गेल्या तीन दिवसांत तीन जण  नाल्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. दरम्यान गडचिरोलीमध्ये तीन जण बेपत्ता झालेत. जिल्हा कार्यालयानं याबाबतची माहिती दिली आहे. बेपत्ता झालेले आणखी तीन जण अजूनही बेपत्ता असल्याचं कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या 129 ठिकाणांहून 353 लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.  IMD कडून गडचिरोलीसाठी 13 जुलैपर्यंत 'रेड' अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी