Mumbai Helmet : बाईक चालक रहा अलर्ट, या अटी मान्य केल्या नाहीत, तर करावा लागेल खिसा मोकळा

Helmet Mandatory For Two-Wheeler Occupants In Mumbai : मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी एक अधिसूचना जारी करून दुचाकीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. यासोबतच या नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Mumbai Helmet: Be a bike rider alert, if these conditions are not met, then you have to clear your pockets
Mumbai Helmet : बाईक चालक रहा अलर्ट, या अटी मान्य केल्या नाहीत, तर करावा लागेल खिसा मोकळा ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दुचाकीच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचे आहे
  • हेल्मेट न घातल्यास 500 रुपये दंड किंवा 3 महिने कारावास
  • मुंबई पोलिसांचा नवा आदेश

मुंबई : दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांना आता हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी आज हे आदेश जारी केले आहेत. १५ दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी आदेशात म्हटले आहे. मोटारसायकल चालवताना मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट न घातल्यास ५०० रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची तरतूदही या आदेशात करण्यात आली आहे.

अधिक वाचा : 

राज्यसभेपाठोपाठ आता विधानपरिषद निवडणूकांचीही घोषणा, १० सीटांसाठी २० जूनला वोटिंग


मुंबई वाहतूक पोलिसांनी एक आदेश जारी केला आहे. म्हणजेच पुढील पंधरवड्यापर्यंत चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. येत्या पंधरवड्यात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. विशेषत: तीन महिन्यांसाठी चालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत १५ दिवसांनंतर दुचाकीच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक होणार आहे.

अधिक वाचा : 

Corona Cases in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या २१७५, बारा जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या शुन्यावर

मुंबई वाहतूक पोलिसांनी ६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या २,४४६ जणांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवला आहे. यासोबतच वाहतूक पोलिसांनी रस्ता सुरक्षेसाठी काही पावले उचलली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी