मुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या..!, कोरोनापाठोपाठ आता 'या' आजारांनी काढलं डोकंवर; पालिका सज्ज

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 13, 2022 | 09:11 IST

Mumbai News: पावसाळी आजारांच्या रूग्णांची वाढती रूग्णसंख्या पाहता पालिकेनं नियोजन सुरू केलं आहे. सध्याच्या स्थितीत पालिकेकडून दीड हजार बेडचं नियोजन करण्यात आलं आहे.

dengue
मुंबईत पावसाळी आजार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुंबईत कोरोना व्हायरस (Corona Virus) आटोक्यात आला आहे.
  • दिवसेंदिवस या पावसाळी आजारांनी बाधित झालेले रूग्ण आढळून येत आहे.
  • पावसाळी आजारांच्या रूग्णांची वाढती रूग्णसंख्या पाहता पालिकेनं नियोजन सुरू केलं आहे.

मुंबई: गेल्या आठवड्यापासून मुंबईत (Mumbai) धो धो पाऊस सुरू आहे. यातच आता मुंबईत कोरोना व्हायरस (Corona Virus) आटोक्यात येत असला तरी पावसाळी आजारांनी डोकंवर काढलं आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईला आता सध्या मलेरिया, डेंग्यू, (Malaria, Dengue) गॅस्ट्रो यासारख्या पावसाळी आजारांनी विळखा घातल्याचं दिसून येत आहे. दिवसेंदिवस या पावसाळी आजारांनी बाधित झालेले रूग्ण आढळून येत आहे. या रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे मुंबई पालिकेची (Mumbai Municipal Corporation) चिंता वाढली आहे. 

जुलै महिन्यात आतापर्यंत म्हणजेच पहिल्या 13 दिवसात मुंबईत मलेरियाचे 119 तर ग्रॅस्टोचे 176 रूग्ण आढळले आहेत. तर डेंग्यूचेही 19 रुग्ण आढळून आले आहेत. जून महिना मुंबईत पावसानं दडी मारली. मात्र जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच पावसानं दमदार एन्ट्री घेतली. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे मुंबईत गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, काविळ यासोबतच मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया अशा आजाराचे रूग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. 

अधिक वाचा-  हनीट्रॅपची तक्रार करणाऱ्या BJP नेत्याचा महिलेसोबतचा खोलीतला 'तो' Video Viral

पालिकेकडून बेडची व्यवस्था 

पावसाळी आजारांच्या रूग्णांची वाढती रूग्णसंख्या पाहता पालिकेनं नियोजन सुरू केलं आहे. सध्याच्या स्थितीत पालिकेकडून दीड हजार बेडचं नियोजन करण्यात आलं आहे. आणखी गरज भासल्यास बेडची संख्या वाढवण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे. 

घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसंच कंट्रोल रूमच्या माध्यमातून दररोज पावसाळी आजारांचा आढावा घेतला जात आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त पावसाळी आजार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जगजागृतीही केली जात आहे. 

पावसाळी आजारांची सद्यस्थितीतील रूग्णसंख्या 

  • मलेरिया 119
  • लेप्टो 5
  • डेंग्यू 19
  • गॅस्ट्रो 176
  • हिपेटायटिस 23
  • 'एच 1 एन 1' 3


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी