Mega Block 7th August: मुंबई लोकल संदर्भातली सर्वांत मोठी बातमी, उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; जाणून घ्या Timetable

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 06, 2022 | 12:50 IST

Mumbai local Mega Block timetable: मुंबईकरांनो जर उद्या लोकलनं प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक (Train Schedule) जाणूनच प्रवास करा. (Mumbai Local Mega Block)

Mumbai Local Mega Block
मुंबई लोकल संदर्भातली सर्वांत मोठी बातमी 
थोडं पण कामाचं
 • उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
 • रुळांच्या दुरूस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी हा मेगाब्लॉक असेल असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 • या मेगाब्लॉकचा परिणाम पश्चिम,(Western Railway) मध्य (Central Railway)आणि हार्बरच्या (Harbor Railway)लोकल वाहतुकीला होणार आहे.

मुंबई: Mumbai Local Mega Block News: उद्या 7 ऑगस्ट म्हणजे उद्या रविवार आहे. मुंबईकरांनो जर उद्या घराबाहेर पडून रेल्वेनं (Train)  प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. उद्या रविवार असल्यानं तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Megablock)  घेण्यात येणार आहे. मुंबईकरांनो जर उद्या लोकलनं प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक (Train Schedule)  जाणूनच प्रवास करा. (Mumbai Local Mega Block)

उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. रुळांच्या दुरूस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी हा मेगाब्लॉक असेल असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम पश्चिम,(Western Railway) मध्य (Central Railway)आणि हार्बरच्या (Harbor Railway)लोकल वाहतुकीला होणार आहे. 

अधिक वाचा-  रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर बनवा स्पेशल चॉकलेट बर्फी,जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. 

उद्याच्या मेगाब्लॉक संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्या. 

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक

 1. सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
 2. या काळात माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. 
 3. ठाणे स्टेशनच्या पुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील 
 4. निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरानं उशिरानं लोकल धावतील. 
 5. सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाणे येथून  सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. 
 6. यावेळेत लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवण्यात येतील. त्यानंतर माटुंगा येथे अप जलद मार्गावर  वळवण्यात येतील. 


हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक 

 1. हार्बर रेल्वेवर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)  मेगाब्लॉक असेल. 
 2. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणाऱ्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे. 
 3. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत  सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. 

या मेगाब्लॉकच्या काळात ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. तसंच  बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवा सुरू असेल. 

अधिक वाचा- पत्रा चाळ घोटाळ्यात संजय राऊत यांच्या पत्नीचा काय संबंध?, आज वर्षा राऊतांची ED चौकशी

पश्चिम मार्गावर असा असेल मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वे मार्गावर  रात्री 12.15 ते मध्य रात्री 3.15 वाजेपर्यंत वसई यार्ड ते दिवा अप डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे वसई यार्डातल्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी