Mumbai Local Train: ट्रेनची वाहतूक अर्धा तास उशीराने, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

गावगाडा
Pooja Vichare
Updated Nov 09, 2022 | 13:13 IST

Mumbai Local Train Updates: रेल्वे सेवेच्या वाहतुकीचा बुधवारी सकाळपासून प्रचंड खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) अंधेरी आणि जोगेश्वरी (Andheri-Jogeshwari) दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला.

Mumbai Local Train Updates
मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर गर्दी 
थोडं पण कामाचं
  • मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा कोलमडली.
  • पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) अंधेरी आणि जोगेश्वरी (Andheri-Jogeshwari) दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला.
  • आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होती.

मुंबई:  Mumbai Local Train Updates: मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा कोलमडली. रेल्वे सेवेच्या वाहतुकीचा बुधवारी सकाळपासून प्रचंड खोळंबा झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील (Western Railway) अंधेरी आणि जोगेश्वरी (Andheri-Jogeshwari) दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. याआधी आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होती.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी आणि जोगेश्वरी या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे.  जलद मार्गावर हा बिघाड झाला आहे. अप आणि डाऊन फास्ट लाईनवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड (Signal Failure) झाल्याची माहिती समोर येतेय. सकाळी सकाळीच रेल्वे सेवा कोलमडल्यानं कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलेय. 

सिग्नल यंत्रणेत झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी किती काळ लागेल, याबद्दल अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचे आज दिवसभरातील वेळापत्रक पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.

अधिक वाचा-  दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

मध्य रेल्वेचाही गोंधळ 

बुधवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. आज सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन्स उशीराने धावत आहेत. अनेक गाड्या 15 ते 30 मिनिटे उशीराने आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 प्राथमिक माहितीनुसार, कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. विशेषत: अप मार्गावरील अनेक लोकल ट्रेन्स रद्द झाल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीरा धावल्याने हा सगळा घोळ निर्माण झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. लोकल ट्रेन्स उशीरा धावत असल्याने प्रवाशांना बराच काळ स्थानकांवर तिष्ठत उभे राहावे लागत आहे. बराच वेळ उलटूनही लोकल वाहतूक विलंबाने सुरु असल्याने रेल्वे स्थानकांवर गर्दी जमायला सुरुवात झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी