Mumbai: मुंबईत धोक्याची घंटा वाजली! स्वाइन फ्लू आणि मलेरियाच्या रूग्णसंख्येत कमालीची वाढ

गावगाडा
पूजा विचारे
Updated Aug 03, 2022 | 12:19 IST

Mumbai Monsoon Diseases Case: गेल्या आठवड्यात स्वाइन फ्लूच्या (Swine flu) रूग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता पुन्हा मलेरिया (malaria) आणि ग्रॅस्टोच्या रूग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.

malaria
मुंबईत मलेरियाच्या रूग्णात वाढ 
थोडं पण कामाचं
  • गेल्या आठवड्यात स्वाइन फ्लूच्या (Swine flu) रूग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली.
  • मुंबई पालिकेची (Mumbai Municipal Corporation) चिंता वाढली आहे.
  • मुंबई पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.

मुंबई: Mumbai Malaria Cases: मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरस (Corona Virus) आटोक्यात येत असला तरी पावसाळी आजारांनी (Monsoon Diseases)  डोकंवर काढलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी डोकेदुखी वाढली आहे. वेगवेगळ्या आजारांचा प्रार्दुभाव वाढल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात स्वाइन फ्लूच्या (Swine flu)  रूग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर आता पुन्हा मलेरिया (malaria)  आणि ग्रॅस्टोच्या रूग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. 

गेल्या एका आठवड्यात मुंबईत स्वाइन फ्लूचे 43 इतके रूग्ण होते. तर मलेरियाचे 166 आणि गॅस्ट्रोचे रूग्ण 155 इतकी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस या पावसाळी आजारांनी बाधित झालेले रूग्ण आढळून येत आहे. या रूग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे मुंबई पालिकेची (Mumbai Municipal Corporation) चिंता वाढली आहे. 

अधिक वाचा- गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर; म्हणाले, ''त्यांना माझ्या...''

मुंबई पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे.  पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेतर्फे घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. तसंच औषधांचे वाटपही करण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागानं आवाहन केलं आहे की, पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर परिसर स्वच्छ ठेवावा. पाणी साचू देऊ नये.

आरोग्य विभागानं म्हटलं की, पावसामुळे पाणी साचून राहत असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. तसंच प्रशासनानं स्पष्ट केलं की, या गोष्टींमुळे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, काविळ असे आजार होतात. तर किटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात.

जून महिन्यात रूग्णांमध्ये झालेली वाढ 

जून महिन्यात मलेरियाचे 350, लेप्टोचे 12, डेंग्यू 39, गॅस्ट्रो 543, हिपेटायटिस 64, चिकनगुनिया 1 तर स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळून आले होते. बाधित रूग्णांचा आकडा पाहता जुलै महिन्यात पावसाळी आजारांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचं चित्र आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी