मुंबई: Mumbai Police received a message threatening of an attack: एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला (26/11 Attack) करून शहर उडवून देण्याचा मेसेज आल्यानं एकच खळबळ उडाली. यानंतर याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या क्रमांकावरून मुंबईवर 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारे मेसेज पाठवण्यात आले होते. त्याचा कोड पाकिस्तानचा (Pakistan) आहे.
या प्रकरणी विरारच्या भाटपाडामधून मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पथक मोहम्मद याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अधिक वाचा- अपघातानं हादरला 'हा' देश, एकाच वेळी 32 ठार; 52 जण जखमी
शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मुबारक हो मुंबई में हमला होने वाला है, असे धमकीचे 26 मेसेज (26 message Mumbai Police) मुंबई पोलिसांना आले आहेत. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक हेल्पलाइनच्या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज आले होते. असे 26 मेसेज पोलिसांना आले आहेत. मुंबई पोलिसांनी खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ केली आहे. या मेसेज प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.
या मेसेजमध्ये 6 दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. तसंच लवकरच मुंबईत 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. या मेसेजनंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.
#UPDATE | Mumbai police crime branch has detained a person from Virar area in connection with a 26/11-like terrorist attack threat message that was received by Mumbai traffic police. Further interrogation underway: Mumbai Police https://t.co/5ClVgB8JQR — ANI (@ANI) August 20, 2022
पाकिस्तानी नंबरवरून मेसेज
कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून धमकीचा मेसेज आल्याची माहिती मिळतेय. अभिनंदन मुंबईमध्ये हल्ला होणार आहे. मुंबईमध्ये हल्ला करण्याची तयारी करत आहे. मी पाकिस्तानमधून आहे. तुमचे काही भारतीय मुंबईला उडवण्यात माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 26/11 चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही तर प्रत्यक्षात येतोय, असा मेसेज पाठवण्यात आला आहे. पुढे मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, जर लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. ज्या नंबरवरून हे मेसेज आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा आहे. पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.
एटीएस आणि पोलीस सतर्क
मुंबई शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगितले की, मेसेज मिळाल्यानंतर राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि शहर पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे. फणसळकर म्हणाले, मुंबईत 26/11 सारखा हल्ला होईल आणि शहर उडवून दिले जाईल, अशी धमकी देणारे मेसेज शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना आले. या मेसेजमध्ये 26/11 चा दहशतवादी अजमल कसाब आणि अल कायदाचा (मारला गेलेला) नेता अयमान अल-जवाहिरी यांचाही उल्लेख आहे.
या मेसेजमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा मुंबईवर हल्ल्याचं सावट आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.