Mumbai Rain: मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावर जात आहात?, तर जाणून घ्या भरतीची वेळ आणि तारीख

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 15, 2022 | 11:36 IST

Mumbai Rain: आज मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. आजपासून पुढील चार दिवस अरबी समुद्रात (Arabian Sea) मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर येतेय.

Mumbai Rain
मुंबईत समुद्राला उधाण 
थोडं पण कामाचं
  • आज मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.
  • आजपासून पुढील चार दिवस अरबी समुद्रात (Arabian Sea) मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर येतेय.
  • सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबई:  Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं धुमाकूळ घातला आहे. आज मुंबईत ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. आजपासून पुढील चार दिवस अरबी समुद्रात (Arabian Sea)  मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर येतेय. यात तब्बल 4.51 ते 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, (Mumbai) कोकण (Konkan)  भागात येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. यावेळी 65 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असल्यानं पालिकेची आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा-  आजपासून मुंबईसह देशभरात सुरू होतेय मोफत Booster Dose मोहिम, जाणून घ्या 75 दिवसांत कोणाला घेता येणार डोस?

आज कसा असेल मुंबईत पाऊस 

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून 45-55 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच 65 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

तारीख भरतीची वेळ लाटांची उंची (मीटरमध्ये)
     
15 जुलै दुपारी 1.22 4.87
16 जुलै दुपारी 2.08 4.85
17 जुलै दुपारी 2.54 4.73
18 जुलै  दुपारी 3.38 4.51

 


मुंबईत आज  दुपारी 1 वाजून 22 मिनिटांनी जुलै महिन्यातील सर्वांत मोठी भरती सुरू होणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.  ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात समुद्रकिनारे फक्त सकाळी 6 ते 10  या वेळेतच सर्वसामान्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाला सुरक्षा बोटी, लाइफगार्ड सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी