Mumbai Rain Update: मुंबईत आजही मुसळधार पाऊस कायम, गरज असेल तरच घराबाहेर पडा; वाचा शहरातल्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 14, 2022 | 11:07 IST

Mumbai Rain Update: मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

Mumbai Rain Update
मुंबईतल्या पावसाचे अपडेट्स  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
 • आज मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 • मुंबईत अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.
 • काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई: राज्यभरात पावसानं धुमशान घातलं आहे. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुंबईत मुसळधार  (Mumbai Rain Update)  पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाकडून (Meteorological Department) आज मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) आज होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनंही नागरिकांना प्रशासनाकडून केलं जात आहे. 

मुंबईतील आजचा पावसाचा अंदाज 

मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून 45-55 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच 60 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

बुधवारीही सोसाट्यांचा वारा 

मुंबई पालिकेच्या पालिकेच्या पर्जन्यमापन यंत्रावरील आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 43.58 टक्के पाऊस झाला आहे. बुधवारी ही मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम आणि मुसळधार पाऊस  झाला. दिवसभर अधूनमधून प्रतितास 45-55 किमी वेगाने वारे वाहिले. त्यामुळे मुंबईत बुधवार सारखीच परिस्थिती आजही कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा केंद्राकडून वर्तवण्यात आली आहे. 


दादरमध्ये दिवसभरातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसामुळे सखल भागात विशेषत: पूर्व उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. येत्या दोन दिवसात मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. 

मुंबईतील पाऊस 

 • दादर -112 मिमी
 • वडाळा- 101 मिमी
 • सीएसटी परिसर- 99 मिमी 
 • वरळी- 99 मिमी 
 • वांद्रे - 84 मिमी 
 • विक्रोळी-  83 मिमी
 • चेंबूर- 82 मिमी 
 • मरोळ- 78 मिमी 
 • भांडूप- 75 मिमी 
 • देवनार-   71 मिमी
 • चेंबूर- 69 मिमी

या ठिकाणी साचलं होतं पाणी 

मुंबईत सक्कर पंचायत वडाळा, दादर टीटी, शेख मिस्त्री दर्गा रोड अ‍ॅण्टॉप हिल, सायन रोड नं. 24, अंधेरी सबवे येथे पाणी साचल्याचं दिसून आलं. दादर पूर्व परिसरात मात्र खूप पाऊस पडूनही हिंदमाता परिसरात यावेळी तुलनेने कमी पाणी साचलं होतं.

अधिक वाचा-  पालकांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, 'या' भागातल्या शाळांना सुट्टी; सर्व परीक्षाही रद्द, जाणून घ्या अपडेट्स

दिवसभरात कुठे कुठे पडली झाडं 

दिवसभरात 86 ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. शहरात 26, पूर्व उपनगरात 17 आणि पश्चिम उपनगरात 25 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या. तर मरीन ड्राईव्ह येथे समुद्र फळाचे झाड वाऱ्यामुळे उन्मळून पडलं.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी