मुंबईकरांनो तुमच्यासाठी Good News,जुलै महिन्यातच मिटली तुमच्या पाण्याची चिंता

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 15, 2022 | 10:35 IST

मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील पाणी साठ्यात लक्षणीय भर पडली आहे.

Tansa Lake overflow
तानसा तलाव ओव्हरफ्लो 
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं धुमाकूळ घातला आहे.
  • मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 14,47, 363 लक्ष लीटर इतकी आहे.
  • मोडक सागर जलाशयही ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील पाणी साठ्यात लक्षणीय भर पडत आहे. त्यातच आता मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. काल रात्री 8.50 वाजता तानसा तलाव ओसंडून वाहू लागला. या तलावाला एकूण 38 दरवाजे आहेत. त्यापैकी काल रात्री 9.50 पर्यंत 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

मुंबई पालिकेनं यासंदर्भातलं ट्विट केलं आहे. मुंबई पालिकेनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की,  मुंबई महानगरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव आज (दिनांक 14 जुलै 2022) रात्री 8.50 वाजता ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाला एकूण 38 दरवाजे आहेत, त्यापैकी रात्री 9.50  पर्यंत 9 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे 14,47, 363 लक्ष लीटर इतकी आहे. त्यापैकी, तानसा तलावाची क्षमता 1 लाख 45 हजार 080  दशलक्ष लीटर इतकी आहे. गेल्यावर्षी दिनांक 22 जुलै 2021 रोजी पहाटे 05.48 वाजता हा तलाव भरुन वाहू लागला होता. 

अधिक वाचा-  आजपासून मुंबईसह देशभरात सुरू होतेय मोफत Booster Dose मोहिम, जाणून घ्या 75 दिवसांत कोणाला घेता येणार डोस?

त्याआधी म्हणजेच 20 ऑगस्ट 2020 रोजी संध्याकाळी 7.05 वाजता तानसा तलाव पूर्ण भरून वाहू लागला होता. 

दरम्यान 13 जुलैला मोडक सागर जलाशय ओसंडून वाहू लागला. त्यानंतर काल तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागल्याचं समजतंय. म्हणजेच जुलै महिन्याच्या पावसाळ्यात महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 2 तलाव आता पूर्ण क्षमतेनं भरून वाहताहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रातही सातत्यानं दमदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जलाशयांची पाणी पातळीही झपाट्यानं वाढली आहे. 

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा 

तलावाचे नाव तलावातील पाणीसाठा टक्केवारी 
     
मध्य वैतरणा 1,22,569 53.98
मोडकसागर 1,28,925 100
तानसा 1,45,080 100
मध्य वैतरणा 1,25,296 64.74
भातसा 4,25,914 59.40
विहार 16,497 59.56
तुळशी 7,351 91.37
एकूण 9,52,550 67


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी