Mumbai Rain: मुंबईला दोन दिवस ऑरेंज अलर्ट, लोकलही स्लो; शहरातील पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 13, 2022 | 12:03 IST

Mumbai Rain Update: मुंबईतही पावसानं धुमशान घातलं आहे. मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे.

Mumbai Rain
मुंबईत पावसाचा हाहाकार  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
  • मुंबईतही पावसानं धुमशान घातलं आहे.
  • मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई: राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबईतही पावसानं धुमशान घातलं आहे. मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षित मुंबईतही (South Mumbai) मुसळधार (Heavy rains)पावसानं हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली आहे.

 माहीम, दादर, परळ, भायखळा (Mahim, Dadar, Paral and Byculla) भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती  हवामान विभागानं दिली आहे. 

के.एस. होसाळीकर यांचं Tweet 

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी ट्वीट केलं आहे. या ट्विट त्यांनी अपडेट केलं आहे की, मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ताज्या सॅटेलाईट आणि रडारचे निरीक्षण केल्यास मुंबईसह ठाणे रायगड आणि पालघर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढचे काही तास या भागांत जोरदार पाऊस पडेल.

पहाटेपासून पुन्हा पावसाला जोर 

मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार आज पहाटेपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. 

लोकलचा वेग मंदावला 

या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या 20 मिनिटं उशीरानं धावत आहेत. सध्या तरी हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्मागवरील वाहतूक सुरळीत आहे. ठाणे रेल्वे स्थानकांत रूळावर पाणी साचलं आहे. 

सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट 

राज्यात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसानं अजूनही विश्रांती घेतली नाही आहे. आज पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, कोकण, विदर्भाच्या काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

अधिक वाचा- मुंबईकरांनो तब्येतीची काळजी घ्या..!, कोरोनापाठोपाठ आता 'या' आजारांनी डोकंवर काढलं आहे

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक (Nashik) आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.  गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.  

पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता  वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी