Mumbai Rains Updates: मुंबईत धो-धो पाऊस कोसळतोय, पटकन पाहून घ्या लोकल ट्रेनचं Status

गावगाडा
पूजा विचारे
Updated Jul 05, 2022 | 15:12 IST

Mumbai Rains Updates: या मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Mumbai Rain (Photo Credit- Roshani Shah)
मुंबईत जोरदार पाऊस (Photo Credit- Roshani Shah)  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.
  • मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
  • मुंबईत कालपासूनच पावसाची (Mumbai Rains Update) संततधार सुरु आहे.

मुंबई: मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाला आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. या मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारपर्यंत हा अलर्ट असणार आहे. मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईत कालपासूनच पावसाची (Mumbai Rains Update) संततधार सुरु आहे.  काल रात्री झालेल्या पावसानंतर मुंबईतील अनेक भागात काही काळ पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. दहिसर ते आनंद नगर, चेंबूर-कांदिवलीपर्यंत  पाणी साचलं आहे.  मुंबईत मध्यरात्री झालेला मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भाग असेलेल्या अंधेरी सबवे, बांद्रा सायन मुख्यमार्ग, चेंबूर, सायन गांधी मार्केट, या सर्व परिसरामध्ये पाणी भरलं. 

धारावी कलानगर रस्त्यावर ही मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आहे. गोरेगाव ते गुंदवली या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे. चेंबूर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूपाचं चित्र आहे. कुर्ला हायवे जंक्शन रस्ता, चेंबूर स्टेशन परिसर, चेंबूर सब वे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

उंच लाटा उसळण्याची शक्यता 

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. 5-6 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मुंबईत हायटाईड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान समुद्रात 2 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.

अधिक वाचा- माँ कालीच्या हातात सिगरेट बघून संतापले नेटकरी, सिनेमाचं पोस्टरवरून कॅनाडात गदारोळ

कोकणाला ऑरेंज अलर्ट 

कोकणाला पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे होणारी संभाव्य परिस्थिती हाताळण्याकरिता रत्नागिरी आणि रायगडमध्ये NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. चिपळूण शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. खेड आणि लांजामध्ये प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती 

रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसानं नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यानंतर खेड नगरपरिषदेनं भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे NDRF चं पथक चिपळुणात दाखल झालं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी