मुंबईकरांना गुड न्यूज, लवकरच धावणार 900 एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस

BEST double decker electric bus : मुंबईत लवकरच 900 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.

Mumbaikars will get 900 AC double decker electric bus soon
मुंबईकरांना सरकारची भेट, लवकरच मिळणार 900 एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बेस्टला मुंबईसाठी 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस मिळणार
  • बसेस इको-फ्रेंडली आहेत
  • बेस्टच्या इंधनात बचत होणार आहे.

मुंबई : मुंबईत लवकरच 900 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले. ते म्हणाले, "आम्हाला जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणायच्या आहेत. आम्ही बेस्टमध्ये 900 नवीन बसेस आणण्याचे नियोजन केले आहे. आम्हाला इंधनावर चालणाऱ्या बसेसऐवजी इलेक्ट्रिक बस आणायच्या आहेत. (Mumbaikars will get 900 AC double decker electric bus soon)

अधिक वाचा : http://Success Story | या ५ जणांनी UPSC परिक्षेत मिळवले असे यश, जे देऊ शकते सर्वांना प्रेरणा

बेस्ट समितीने मंगळवारी 900 एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बससाठी 12 वर्षांचा करार मंजूर केला. या प्रकल्पासाठी एकूण 3600 कोटी रुपये खर्च येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. सध्या राज्य सरकारने यासाठी ९९२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत हा निधी देण्यात आला आहे. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले, “या वर्षी 225 डबलडेकर बसेसची पहिली तुकडी येण्याची अपेक्षा आहे तर दुसरी तुकडी 225 बसेससह पुढील वर्षी मार्चपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. याशिवाय उर्वरित 450 बसेस जून 2023 पर्यंत पोहोचवल्या जातील. 

अधिक वाचा : http://Films will release in 2022 : 2022मध्ये येणारे 23 बिग बजेट सिनेमा, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत


चंद्र म्हणाले, "सध्या मुंबईत ४८ डबलडेकर बस धावत आहेत. 900 AC इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बसेस ज्या इको-फ्रेंडली देखील आहेत येत्या एक दशकासाठी सेवेत असतील. प्रवासाचा अनुभव देखील देईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी