Murder of a child : एका वेड्याने दिलेल्या क्ल्यू मुळे खुनाचा छडा, अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या उद्देशानेच बालकाचा दाबला गळा

Murder of a child in Satara : पाच वर्षाच्या एका बालकाचा खून झाला होता. पण तपासात पोलिसांना काहीच हाती येत नव्हते. गावाने सतत नावे ठेवून ठरवलेला एक वेडा येथे 'शहाणा' ठरला होता. तोच पोलिसांसाठी महत्वाचा 'दुवा' ठरला. त्याच्या मदतीमुळे पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोहचता आले.

Murder of a child: Murder of a child by a crazy clue,The child's sore throat with the intention of committing unnatural rapes
Murder of a child : एका वेड्याने दिलेल्या क्ल्यू मुळे खुनाचा छडा, अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या उद्देशानेच बालकाचा दाबला गळा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भाड्याच्या घरात राहत असलेल्या दाम्पत्याच्या पाच वर्षाच्या बालकाचा खून
  • पोलिसांनी घटनास्थळ, आजूबाजूची परिस्थिती पाहून तपास सुरु केला
  • गुन्हेगाराला घराची कडी लावताना पाहिले

Murder of a child Mhasave सातारा : सातारा (satara) तालुक्यातील म्हसवे गावात मंगळवारी रात्री पाच वर्षाच्या एका बालकाचा (child) खून झाल्याची घटना घडल्याने 'त्या' गावाची तर झोपच उडाली होती. ही घटना सातारा पोलिसांसाठी (police) धक्कादायकच होती. घरी कोणी नसताना हा प्रकार घडल्यामुळे त्याची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पण संपूर्ण गावाने ज्या व्यक्तीला वेडे ठेवले होते. त्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या क्ल्यूमुळे त्या निरागस बालकाचा खून (murder) करणार आरोपी पोलिसांच्या हाती लागला. (Murder of a child: Murder of a child by a crazy clue,The child's sore throat with the intention of committing unnatural rapes)

मूळचे माण तालुक्यातील असलेले आणि सध्या सातारा तालुक्यातील एका गावात भाड्याच्या घरात राहत असलेल्या दाम्पत्य बाहेर गेले होते. तेव्हा घरात एकटाच पाच वर्षाचा मुलगा खेळत होता. सायंकाळी ते दोघे घरात आल्यानंतर पाहिले, असता ते बालक स्वयंपाक घरात निपचित पडले होते. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखले केले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बालकाचा खून ही घटना सातारा पोलिसांसाठी धक्कादायकच होती.

साक्षीदारावर होता गावचा संशय

पोलिसांनी घटनास्थळ धाव घेऊन तपास सुरू केला होता. याचवेळी पोलिसांनी दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु केली. पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या तरीही हाती काही लागले नव्हते. अगदी अंतिम क्षणी यातून एक नाव पुढे आले. पोलिसांना संशयित म्हणून ज्याचे नाव सांगण्यात आले; त्याला गावातील लोक वेडा म्हणत होते. त्यानेच असे काहीतरी केले असेल, असे वारंवार सांगण्यात येऊ लागले.

दाराची कडी लावताना पाहिले

पोलिसांपुढे आता काहीच पर्याय उरला नव्हता. संशयित म्हणून ज्याचे नाव सांगण्यात आले त्याला ताब्यात घेतले. चौकशी सुरू झाली. त्याची अवस्था पाहून पोलिसांना काही समजून येत नव्हते.  'मी एकाला त्या मुलाच्या घराची कडी लावताना पाहिले,' असे त्याने सांगताच पोलिसांनी 'तो कोण आहे..?,' अशी विचारणा केली. यावर त्याने दाराची कडी लावणाऱ्या मुलाला गावात कोणत्या टोपण नावाने हाक मारली जाते, याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनुसार, तो एक शाळकरी पोरगा होता. पोलिसांनी 'त्या' शाळकरी पोराचा शोध सुरु केला तर तो नातेवाईकाच्या घरी 'गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

खून करुन तो झोपला होता

सातारा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपीने खूनाची कबुली दिली असून त्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना ते ओरडू नये म्हणून त्याने त्याचे तोंड अन् नाक दाबून धरले. यातच ते बालक खाली पडल्याने शाळकरी पोरगं घाबरुन गेले. त्याने घरातील पाणी घेतले आणि त्याच्या तोंडावर मारले. मात्र, ते उठले नाही. काहीतरी अघटित घडले असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि तो बालकाच्या घरातून बाहेर पडला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी