Nagar Panchayat Election : रोहित पवारांचं नगरपंचायत निवडणुकीत campaigning, कर्जतच्या 'काॅमन मॅन'शी केला डायलाॅग,

Nagar Panchayat Election :अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीच्या टप्प्यात थेट प्रचारसभाऐवजी भेटीगाठींवर जोर दिल्या. मतदारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.

Rohit Pawar's dialogue with Common Man, Karjat Nagar Panchayat election campaign
रोहित पवारांचा 'काॅमन मॅन'शी डायलाॅग, कर्जत नगरपंचायत निवडणुकीत प्रचार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कर्जत येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तर भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे असा सामना आहे.
  • रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय.

Nagar Panchayat Election अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra politics) तब्बल पाच दशके दबदबा असणाऱ्या पवार घराण्याच्या चौथ्या पिढीबाबत राज्यभरात उत्सुकता आणि कुतूहल आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सरकारमधील मंत्र्यांचा पराभव करुन शरद पवार यांचे नातू रोहित पवार (rohit pawar) चांगलेच चर्चेत आले. हळूहळू त्यांनी अहमदनगरच्या (ahamdanagar) राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केली. सध्या कर्जत नगरपंचायतीची (nagarpachayat) निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात थेट प्रचारसभाऐवजी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. यामध्ये विविध घटकांशी संवाद साधत असल्याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. (Nagar Panchayat Election: Rohit Pawar's dialogue with Common Man, Karjat Nagar Panchayat election campaign)

अहमदनगरमध्ये पवारांचा शिरकाव

गेली पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात सक्रीय असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या कृषिमंत्रिपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले. पवार कुटुंबियांची चौथी पिढीत शरद पवार यांचे बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू आणि राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार यांनी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आपलं नेतृत्त्वही सिद्ध केले आहे. 

मतदारांशी संवाद

कर्जत-जामखेड मतदारसंघात त्यांची भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्याशी संघर्ष होत असतो. सध्या कर्जत नगरपंचायतीसाठी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.  आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधत आहेत. कधी ते बाजारात जाऊन भाजी विक्रेत्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. तर अनेक ठिकाणी कापड दुकानात, तर कधी रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर कार्यकर्त्यांसोबत पाणीपुरीची टेस्ट घेतली.

हटके प्रचाराची चर्चा

तसेच कर्जतमध्ये प्रचारानिमित्त कुंभार गल्लीत गेले असता काही बांधव संक्रांतीसाठी बोळके बनवत होते. रोहित पवार यांनीही त्या फिरत्या चाकावर चिखलाला आकार देऊन बोळके निर्मितीचा विलक्षण अनुभव घेतला. एका सलूनच्या दुकानात कटिंग देखील त्यांनी केली. त्याचबरोबर एका कार्यकर्त्याच्या टेम्पोचे पूजन करुन त्यांची राईड मारली. विद्यार्थ्यांना अंतराळाबाबत रुची निर्माण व्हावी यासाठी 'सफर अंतराळाची' हा उपक्रम सुरू करण्यात आला.यावेळी शाळेत विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमाचा शुभारंभ केला. तर काही वेळ हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेतला. त्यांच्या या हटके प्रचाराची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. कर्जत शहरात विविध भागात व्यावसायिकांची आणि नागरिकांच्या घरी जाऊन ते भेट घेत आहेत. नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ज्या विकासाचा कार्यक्रम घेऊन लढत आहे, याबाबतची माहिती यावेळी त्यांना दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी