सिंधुदुर्गात राणे पॅटर्नची सरशी, जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील १९ जागांपैकी ११ जागांवर विजय मिळवून भाजपने वर्चस्व मिळवले आहे. एकूण निकालात राणेंची सरशी झाल्यानं भाजप व राणे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Narayan Rane win in Sindhudurg, District Bank election pushes Mahavikas Aghadi
सिंधुदुर्गात राणे पॅटर्नची सरशी, जिल्हा बॅंक निवडणूक महाविकास आघाडीला धक्का  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेवर नारायण राणेंचे वर्चस्व
  • १९ जागांपैकी ११ जागांवर विजय
  • महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या (Sindhudurg District Bank) निवडणुकीमुळे संपूर्ण कोकणातील वातावरण तापले होते. या निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (netesh rane) यांच्यावर आरोप झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या नेतृत्व काम राहिले असून त्यांनी एकूण 19 जागांपैकी 11 जागांवर विजय मिळवला आहे. (Narayan Rane win in Sindhudurg, District Bank election pushes Mahavikas Aghadi)

सिंधुदुर्ग हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून त्यांचा जिल्ह्यातील सर्व संस्थांवर पकड राहिली आहे. मात्र, यावेळी जिल्हा बॅंकेच्या निवडणूक महाविकास आघाडीने टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यांच्या अटकेमुळे नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं. 

या निकालातत महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे बॅंकेच विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 'गाडलाच' या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
 

दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.  याठिकाणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले. एकूण निकालात राणेंची सरशी झाल्यानं भाजप व राणे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी