Nashik Bus Accident | भरधाव वेगात आली बस, अन् होत्याचे नव्हते झाले..., 14 जखमी, 6 गंभीर

Nashik Bus Accident | त्र्यंबकेश्वर येथून परतणाऱ्या भाविकांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जण जखमी झाले आहेत.

Nashik Bus Accident | Thrilling accident of bus returning from Devadarshan
Nashik Bus Accident | भरधाव वेगात आली बस, अन् होत्याचे नव्हते झाले..., १४ जखमी, ६ गंभीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नाशिकमध्ये भाविकांच्या बसचा अपघात
  • १४ जण जखमी
  • जखमींवर रुग्णालयात उपचार

नाशिक : नाशिकमध्ये देवदर्शनावरुन परणाऱ्या प्रवाशांची बस उलटली. यात बसमधील 14 जण जखमी झाले असून त्यापैकी सहा जण गंभीर आहेत. त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावर दुपारी २ च्या सुमारास हा अपघात झाला जेव्हा पर्यटकांचा एक गट ब्रह्मगिरी पर्वत रांगेला भेट देऊन हॉटेलकडे परतत होता. (Thrilling accident of bus returning from Devadarshan)

अधिक वाचा : कीर्तनकार इंदूरीकरांच्या सासूबाईंचा भाजपमध्ये प्रवेश; बाळासाहेब थोरात गटाला धक्का

बुलढाणा येथील भाविक नाशिक जिल्ह्यामध्ये देवदर्शनासाठी आले होते. ते गंगाद्वार येथे हाॅटेलमध्ये मुक्कामाला होता. सोमवारी सकाळी ते मिनीबसमधून ब्रह्मगिरी पर्वत रांगेला भेट देऊन परतत होते. या बसमध्ये चालकासह 34 प्रवासी होते.

त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावर भरधाव वेगात असलेली बस वळण घेत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मिनी बस नाल्यामध्ये उलटली, तसेच झाडाला धडकी यात तब्बल 14 प्रवासी जखमी झाले आणि त्यांना त्र्यंबकेश्वर रुग्णालयात हलवण्यात आले, तेथून सहा जणांना नाशिकच्या जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि दोघांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमी झालेल्या सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा : Weather Update in Maharashtra :  पुण्यात काही दिवसात हुडहुडी वाढणार

सर्व जखमी बुलढाणा जिल्ह्यातील चांडोल गावचे रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच मृताच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठले. एक छोटासा अपघात झाल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की हा अपघात अतिशय भीषण होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी