मंदिरात दर्शन घेतल्यावर पत्नीसोबत फोटो काढला, नंतर शिखरावरुन दिलं ढकलून

गावगाडा
Updated Jul 16, 2019 | 18:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Husband pushed wife: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...

Dead body
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • मंदिरात दर्शन घेतल्यावर पतीने पत्नीला दरीत ढकललं
  • नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना
  • आरोपीला पोलिसांनी केली अटक

नाशिक: Man pushed wife to death: नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविक नेहमीच गर्दी करत असतात. अशाच प्रकारे एक दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी रविवारी रात्री दाखल झाले. त्यानंतर रात्री एका ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. मग सोमवारी सकाळी हे दाम्पत्य देवीच्या दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात देवीचं दर्शन घेतल्यावर या पतीने आपल्या पत्नीला सतीच्या कड्यावरुन ढकलून दिल्याची घटना उघडकीस आली. या घटनेप्रकरणी आरोपी बाबूलाल काळे याला पोलिसांनी पकडले आहे.

बाबूलाल काळे आणि कविता यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता. लग्नानंतर हे दाम्पत्य राज्यातील प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नाशिकमध्ये रविवारी दाखल झाले. रविवारी रात्री उशीर झाल्याने त्यांनी एका खोलीत आश्रय घेतला त्यानंतर सकाळी उठल्यावर त्यांनी देवदर्शनाला जाण्यापूर्वी खरेदी केली आणि मग देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचले. मंदिरात सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेतल्यावर हे दाम्पत्य शेजारीच असलेल्या सतीच्या कड्यावर पोहोचले. या ठिकाणी दाम्पत्याने फोटो सुद्धा काढले.

फोटो काढल्यानंतर आरोपी बाबूलाल काळे याने आपली पत्नी कविता हिला सतीच्या कड्यावरुन खाली खोल दरीत ढकलले. ही घटना एका नागरिकाने पाहिली आणि त्याने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथे उपस्थित भाविकांनी आरोपी बाबूलाल काळे याला पकडले. त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. 

कविता हिला दरीत ढकलून दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. कविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर, आरोपी बाबूलाल काळे याची पोलीस चौकशी करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. कौटुंबिक वादानंतर आरोपी बाबूलाल काळे याने पत्नी कविता हिला दरीत ढकलून दिलं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

स्वस्त फोन दिल्याने आत्महत्या

तर तिकडे मध्यप्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. पतीने स्वस्त फोन दिल्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील पिपलानी परिसरात ही घटना घडली आहे. पत्नीला स्मार्टफोन हवा होता आणि त्यासाठी पतीने तिला ७,५०० रुपयांचा फोनही घेऊन दिला. मात्र, स्वस्त फोन दिल्याने पत्नी नाराज झाली. तिला १५,००० रुपयांचा फोन हवा होता आणि त्यासाठी तिने भांडणही केलं त्यानंतर तिने रागाच्या भरात आत्महत्या केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
मंदिरात दर्शन घेतल्यावर पत्नीसोबत फोटो काढला, नंतर शिखरावरुन दिलं ढकलून Description: Husband pushed wife: महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...