Jayant Patil : राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफुस, विरोधी पक्षेनेतेपदावरून जयंत पाटील नाराज

अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत. अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यासाठी पाटील यांनी रीतसर पत्रही दिले नव्हते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी जयंत पाटील यांना यासाठी फोन करावा लागला होता.

Jayant Patil
जयंत पाटील  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज आहेत.
  • अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यासाठी पाटील यांनी रीतसर पत्रही दिले नव्हते.
  • राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी जयंत पाटील यांना यासाठी फोन करावा लागला होता.

Jayant Patil : मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. विरोधी पक्षनेत्ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे विरोधी नेतेपक्षाची जबाबदारी आली. अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President ) जयंत पाटील (Jayant Patil) नाराज आहेत. अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षाची जबाबदारी देण्यासाठी पाटील यांनी रीतसर पत्रही दिले नव्हते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी जयंत पाटील यांना यासाठी फोन करावा लागला होता. (ncp leader jayan patil unhappy over opposition leadership post given to ajit pawar)

अधिक वाचा : मुंबै सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रविण दरेकर

विधीमंडळात भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक आमदार होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपनंतरचा मोठा पक्ष ठरला. हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवावी, पक्षाच्या या निर्णयामुळे जयंत पाटील नाराज होते. राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ३६ आमदारांनी अजित पवार यांना विरोधी पक्षनेते करावे असे पत्र पक्षाकडे दिले होते. तसेच विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे असावे यासाठी शरद पवार यांनी समिती नेमली होती. या समितीत अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि जयंत पाटील होते. अजित पवार यांच्याकडे विरोधीपक्ष नेतेपद असावे असा निर्णय या समितीने दिला होता.

अधिक वाचा : Maharashtra Rain: पुढील २४ तास मुसळधार पावसाचे, 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

जयंत पाटील नाराज असल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. परंतु पाटील यांनी हे वृत्त फेटाळले तसेच आपण राष्ट्रवादी सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले. अजित पवार यांना विरोधीपक्ष नेतेपदासाठी पाठिंबा देणारे पत्र मागण्यासाठी धनंजय मुंडे जयंत पाटील यांच्याकडे गेले होते. तेव्हा आपण थोड्याच वेळात पत्र देऊ असे पाटील म्हणाले परंतु त्यांनी पत्र दिले नाही. अखेर प्रफुल पटेल यांनी जयंत पाटील यांना दोन वेळा फोन केला.

अधिक वाचा : Shinde-Thackeray-BJP : शिंदे गटाचा भाजप आणि ठाकरे गटाला धक्का 

एका राष्ट्रवादीच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ३६ आमदारांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार यांच्या नावावर संमती दर्शवल्याने जयंत पाटील नाराज होते. जयंत पाटील हे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते असून त्यांनी अर्थ, गृह सारखी खाती सांभाळली आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही आहे.

अधिक वाचा : FTII च्या हाॅस्टेलमधून येत होती दुर्गंधी, खिडकीतून बघितलं तर...

असे असले तरी पाटील यांनी आपण नाराज असल्याचे वृत्त फेटाळले आहे. ३ जुलै रोजी आमदारांची बैठक पार पडली, त्यात अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुसर्‍याच दिवशी आपण विधासभा अध्यक्षांकडे तसे पत्र दिल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. प्रफुल पटेल यांच्यासोबत फोनवर कुठलीच चर्चा झाली नसल्याचेही पाटील यांनी नमूद केले आहे.

अधिक वाचा : मर्डरनंतर बिर्याणी पार्टी..., अमरावती प्रकरणात NIA चे अनेक धक्कादायक खुलासे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी