big fat wedding trend : राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली बिग फॅट वेडिंग ट्रेंडला फाटा, मुलीचे घरच्या घरी साध्या पद्धतीने लावलं लग्न

Jitendra Awhad Daughters Wedding : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थाटामाटात लग्न लावण्याच्या ट्रेंडला फाटा देत, त्यांनी त्यांची मुलगी नताशाचे लग्न आपल्या ठाण्यातील घरी साध्या पध्दतीने नोंदणी करुन केले. 

big fat wedding trend : Big fat wedding trend: NCP Minister Jitendra Awhad breaks the Big Fat Wedding trend, The marriage was arranged in a simple way at the house
big fat wedding trend : राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली बिग फॅट वेडिंग ट्रेंडला फाटा, मुलीचे घरच्या घरी साध्या पध्दतीने लावलं लग्न   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह साध्या पध्दतीने
  • घरी नोंदणी करुन पार पडला विवाह सोहळा
  • मोजक्या लोकांची उपस्थिती

 NCP Minister Jitendra Awhad daughter marriage ।  मुंबई : प्रत्येक व्यक्तीसाठी विवाह सोहळा हा अविस्मरणीय क्षण असतो. आपल्या देशात लग्न म्हटलं की ते थाटामाटातच झालं पाहिजे, जर हा सोहळा उद्योगपती, राजकारणी किंवा बॉलिवूड इंडस्ट्रीतील स्टारचा असेल तर लग्नाच्या ठिकाणापासून ते पोशाखांपर्यंत खास बनवण्यासाठी वर्षभर आधीच तयारी सुरू करतात, ज्यासाठी ते पाण्यासारखे पैसे खर्च करतात. याच कारणामुळे या राॅयल लग्नाचा खर्च करोडोपर्यंत पोहोचतो. पण सध्या महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच रंगत आहे. (big fat wedding trend : NCP Minister Jitendra Awhad breaks the Big Fat Wedding trend, The marriage was arranged in a simple way at the house)

शाही पद्धतीने लग्नांचा ट्रेंड

अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा विवाहबंधनात अडकले. या जोडप्याचे लग्न भव्यदिव्य झाले होते. मागील काही दिवसांपासून सर्वांच्या नजरा कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्यावर आहेत. दोघांचे राजस्थानमधील सिक्स सेन्सेस हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न झाले, त्यांच्या लग्नाचा खर्च जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

मोजक्या लोकांची उपस्थिती

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थाटामाटात लग्न लावण्याच्या ट्रेंडला फाटा देत, त्यांनी त्यांची मुलगी नताशाचे लग्न आपल्या ठाण्यातील घरी साध्या पध्दतीने नोंदणी करुन केले. अलिकडच्या काळात, अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती, राजकारण्यांनी कोविड-19 प्रोटोकॉल पायदळी तुडवून शेकडो पाहुण्यांसह भव्य विवाहसोहळे करतात. मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाने कोणत्याही स्वरुपाचा धूमधडाका न करता अॅलन पटेलशी लग्न केले. या लग्न सोहळ्यास काहीच पाहुणे उपस्थित होते. नताशा आणि अॅलन शालेय दिवसांपासून एकमेकांना ओळखतात.

आव्हाड म्हणाले की, 25 वर्षांपासून तुमच्या अंगाखांद्यावर खेळणारी मुलगी घरी राहणार नाही हे पाहणे वेदनादायक आहे. मला आपल्या मुलीचे लग्न फॅट वेडिंग ट्रेंडप्रमाणे करायचे नव्हते. त्यामुळे एक साधा नोंदणीकृत विवाह निवडला गेला. त्यांच्या मुलीच्या इच्छेनुसार, लग्नाचा कार्यक्रम होता, परंतु त्यांच्या मतदारसंघातील लोकांसाठी स्वागत समारंभ आयोजित केला जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी