Supriya Sule : शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन बनत नाही म्हणून लोक टीका करतात, सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर

शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन बनत नाही म्हणून काही लोक पवार यांच्यावर टीका करतात असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार हे सातत्याने इथेनॉल ऊस पीकावर बोलतात हा राजकीय नव्हे तर सामाजिक विषय आहे असेही सुळे म्हणाल्या.

थोडं पण कामाचं
  • शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन बनत नाही म्हणून काही लोक पवार यांच्यावर टीका करतात
  • नितीन गडकरी आणि शरद पवार हे सातत्याने इथेनॉल ऊस पीकावर बोलतात
  • हा राजकीय नव्हे तर सामाजिक विषय आहे असेही सुळे म्हणाल्या.

Supriya Sule : नागपूर : शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन बनत नाही म्हणून काही लोक पवार यांच्यावर टीका करतात असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार हे सातत्याने इथेनॉल ऊस पीकावर बोलतात हा राजकीय नव्हे तर सामाजिक विषय आहे असेही सुळे म्हणाल्या.

कश्मीरमध्ये पुन्हा कश्मीरी पंडितांना लक्ष्य केले जात आहे त्यांचे पलायन सुरू झाले आहे, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की केंद्र सरकार चित्रपटात व्यग्र आहेत, केंद्र सरकार सत्य परिस्थितीपासून दूर आहे. कश्मीरबाबत जे काही निर्णय घेण्यात आले ते अतिशय घाईने घेण्यात आले, त्याचे आज परिणाम दिसत आहेत. पाच दिवसांत सात जणांची हत्या करण्यात आली. यासाठी पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे यावर त्यांना उत्तर द्यावेच लागेल असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

विदर्भात राष्ट्रीय काँग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, पक्षात चुकीच्या लोकांनी प्रवेश करू नये म्हणून जयंत पाटील प्रयत्न करत आहेत असेही सुळे म्हणाल्या. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत आहे ही बाब दुर्दैवी असल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला,मात्र दुर्दैव आहे की महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर अशी गोष्ट होत आहे, कुठल्याही सुसंस्कृत राज्यासाठी ही  चांगली बाब नाही अशी सुळे म्हणाल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी