Bharat Jodo Yatra : ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनाक्रम दस्तुरखुद्द नितीन राऊतांकडून…

Congress leader Nitin Raut : भारत जोडो यात्रेदरम्यान माजी मंत्री आणि महाराष्ट्रातील काॅग्रेसचे नेते नितीन राऊत जमिनीवर पडल्याने त्यांना दुखापत झाली.

Nitin Raut pushed by cops hurt in Bharat Jodo Yatra hospitalized
Bharat Jodo Yatra : ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं; ऐका घटनाक्रम दस्तुरखुद्द नितीन राऊतांकडून…  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारत जोडो यात्रेत पोलिसांकडून धक्काबुकी
  • महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नितीन राऊत जखमी
  • हैद्राबाद येथील वसावा रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ.नितीन राऊत बुधवारी डावा डोळ्याला जखम झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  तेलंगणा पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले. त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर राऊत यांनी झालेल्या दुखापतीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. (Nitin Raut pushed by cops hurt in Bharat Jodo Yatra hospitalized)

अधिक वाचा : 19 उप जिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती 

नेमकं काय घडलं?

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रा हैदराबाद पोहचली असताना जवळपास ट्राफीक बंद असल्याने पाच किलोमीटर चालत मी इंदिरा गांधींच्या पुतळ्याजवळ पोहोचलो. स्टेजच्या जवळ पोहोचलो तेव्हा राहुल गांधींचा ताफा येथे होता. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पोलिसांना काय झालं माहिती नाही, ते अचानक काॅंग्रेस कार्यकर्त्यांवर तुटून पडले. त्यांना बाजूला करायला लागले, मी कोपऱ्यात होतो तरी माझ्या छातीवर एसीपी आणि चार पोलिसांनी जोरात धक्का दिला.त्यामुळे तोल जाऊन खाली कोसळलो

थोड्या वेळात मी स्वत:ला सावरलं. त्यानंतर त्यानंतर सारखं २२ मिनिटं ब्लिडींग होतं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी यात्रेतील एका अॅम्ब्युलन्समध्ये प्राथमिक उपचार घेतले. पण रक्तस्राव थांबत नव्हता म्हणून दीड ते दोन किलोमीटर पायी गेल्यानंतर एकाच्या बाईकवरून रुग्णालयात पोहचलो असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले. 

अधिक वाचा : BMC Contract : मुंबईला खड्डेमुक्त करण्याची योजना लांबणीवर, 5800 कोटी रुपयांचे कंत्राट मुंबई महानगरपालिकेकडून रद्द

डॉ. नितीन राऊत यांना स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने जोरात धक्काबुक्की केली, त्यामुळे ते जमिनीवर पडले, त्यांच्या डोक्याला, उजव्या डोळ्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या वर्तनामागील हेतू स्पष्ट नसला तरी डॉ. राऊत यांना हैदराबाद येथील वसावा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दूरध्वनीद्वारे डॉ. नितीन राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, एआयसीसीचे पदाधिकारी के.सी. वेणुगोपाल, के. राजू, राजेश लिलोथिया, इम्रान प्रतापगडी, कन्हैया कुमार, तेलंगणातील विरोधी पक्षनेते हत्ती विक्रमार्का आणि इतरांनी हॉस्पिटलमध्ये डॉ. राऊत यांना फोन केला किंवा भेट दिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी